कोरोनाकाळात मानसिक आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:03+5:302021-06-20T04:10:03+5:30
पहिल्या लाटेत कुटुंबातील एक-दोघांना कोरोना झाला. मात्र, दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या ...
पहिल्या लाटेत कुटुंबातील एक-दोघांना कोरोना झाला. मात्र, दुसऱ्या लाटेत अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या मनात अधिक भीती निर्माण झाली होती. काहींचा रोजगार, काहींचा व्यवसाय बंद बडल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली होती. कसे होणार, या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा आधार घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन केले तरी कोरोनाच्या धक्क्यातून अजूनही काही व्यक्ती बाहेर निघालेले नाहीत. त्यामुळे कुणाची बोलती बंद झाल्याचे चित्र आहे. काहींना झोपच लागत नसल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम जाणवत आहे. अशा रुग्णांना सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जावे लागत आहे.
बॉक्स
चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या
गत काही वर्षांपासून कृषी क्षेत्राला सारखा फटका बसत आहे. यातून शेतकरी कुटुंब सावरणे अवघड झाले आहे. महागाई वाढतीच असून, त्यात निसर्गाचा प्रकोप अधिकच भर पाडताना दिसत आहे. त्यामुळे कर्जापायी विवंचनेत येऊन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे एकंदरीत जून महिन्यातील चार घटनांवरून लक्षात येत आहे.
--
मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात?
पहिल्या लाटेत मानसिक रुग्णांची तपासणी कमी प्रमाणात झाली. मात्र, दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण अधिकच वाढले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूची संख्या वाढल्याने अधिकच भीती वाटू लागल्याने तणावात रात्री झोप न येण्याच्या तक्रारी वाढल्या. व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढल्याने दुरुस्त झालेले रुग्णातदेखील मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसू लागली आहे.
- डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ
--
कोरोनामुळे मानसिकतेवर नक्कीच परिणाम झालेला आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने, कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्याने अनेक जण तणावात आलेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मानसिक रुग्ण भरपूर आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रवासी वाहतुकीच्या अभावामुळे ते रुग्णालयापर्यंत पोहोचलेले नाहीत. भविष्यात ही संख्या वाढणार आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत राठी,
मानसोपचारतज्ज्ञ
-
हे दिवसही जातील...
कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. यामुळे चिंतेत भर पडली आहे.
अनलॉक होताच अनेकांना पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. कोरोना थांबणार आणि आपला रोजगार पूर्ववत होणार, अशी आशा अनेकांना लागलेली आहे.
कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. याशिवाय प्रत्येक दिवस सारखा नसतो.