औषधांचा साठा वाढवा, रुग्णांना रेफर करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:28+5:302021-07-19T04:09:28+5:30
परतवाडा : अचलपूर भाजपाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आले. यात त्यांनी रुग्णालयातील औषधांचा साठा वाढवा, रुग्णांना ...
परतवाडा : अचलपूर भाजपाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आले. यात त्यांनी रुग्णालयातील औषधांचा साठा वाढवा, रुग्णांना विनाकारण अमरावतीला रेफर करू नका, अपंगांकरिता वार्डा-वार्डांत लसीकरण कॅम्प घ्या, बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता व राबणाऱ्या हमाल बांधवांकरिता बाजार समिती आवारात लसीकरण कॅम्प घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासोबतच उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हॅक्सिनेशन सेंटर ठेवावे आणि ब्लड बँकेची व्यवस्था करावी, एक स्वतंत्र स्त्री रुग्णालय कार्यान्वित करावे, या मागण्याही भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी अभय माथने, गजानन कोल्हे, सुमित चौधरी, रुपेश लहाने, राजेश चौधरी, नगरसेविका अक्षरा लहाने, दिनेश उघडे, मनीष लाडोळे, धर्मराज राऊत, मुन्नाभाई डब्बेवाले, आशिष मानमोडे, अरुण निरातकर, गिरीश आसलकरसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना एक निवेदन देण्यात आले. प्रसन्न काठोळे, शुभम खेरडे, शिवा बुंदेले यांनी दिलेल्या निवेदनात कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे लसीकरण कॅम्प घेण्याबाबत म्हटले आहे. बाजार समितीत कॅम्प घेऊन व्यापारी, अडते, हमाल तसेच उपस्थित शेतकऱ्यांना लस उपलब्ध करून देण्यास त्यांनी सुचविले आहे.