‘पायरेथ्राईड’च्या अती वापरानेही बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीत वाढ, आयएससीआय व एसएबीसीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 04:50 PM2018-03-01T16:50:29+5:302018-03-01T16:50:29+5:30

बोंडअळीवर प्रभावी असलेला ‘पायरेथ्राईड’ हा घटक कीटकनाशकांच्या शिफारस मात्रेपेक्षा कैकपटीने करण्यात आलेल्या फवारणीमुळेही गुलाबी बोंडअळीमध्ये या घटकाविरूद्ध ५०० पटीहून अधिक प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट, मुंबई (आयएससीआय) व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्ली (एसएबीसी) यांच्या अहवालात नमूद आहे.

Increased immunity for bollworm, ISCI and SABC report, with the use of 'pyrethride' overuse | ‘पायरेथ्राईड’च्या अती वापरानेही बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीत वाढ, आयएससीआय व एसएबीसीचा अहवाल

‘पायरेथ्राईड’च्या अती वापरानेही बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीत वाढ, आयएससीआय व एसएबीसीचा अहवाल

Next

- गजानन मोहोड

अमरावती : बोंडअळीवर प्रभावी असलेला ‘पायरेथ्राईड’ हा घटक कीटकनाशकांच्या शिफारस मात्रेपेक्षा कैकपटीने करण्यात आलेल्या फवारणीमुळेही गुलाबी बोंडअळीमध्ये या घटकाविरूद्ध ५०० पटीहून अधिक प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट, मुंबई (आयएससीआय) व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, नवी दिल्ली (एसएबीसी) यांच्या अहवालात नमूद आहे.
बीटी जनुकामुळे कपाशीच्या अंगी बोंडअळीला दाद न देण्याची क्षमता विकसित करण्यात आली. मात्र बीटी कपाशी तंत्रज्ञान चुकीच्या वापरामुळे गुलाबी बोंडअळीत त्याविषयीची प्रतिकारक्षमता विकसित झाली. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या पूरक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय बीटी कपाशी यशस्वी ठरणार नसल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीसह बोलगार्ड-११ चा अवलंब केला असता तर हे तंत्रज्ञान १५ वर्षांसाठी अधिक किफायतशीर व प्रभावी ठरले असते. सध्या मात्र गुलाबी बोंडअळीची मोठ्या प्रमाणावर प्रतिकारक्षमता वाढून तिचा उद्रेक झाला आहे.
राज्यातील कपाशी उत्पादन क्षेत्रात क्वचितच पिकांची फेरपालट केली जाते. त्यामुळे दरवर्षी कपाशीचेच पीक घेतल्यामुळे किडीला त्या क्षेत्रात कायमस्वरूपी मुक्काम ठेवण्याइतकी अनुकूल परिस्थिती तयार झाली. तसेच लागवडीसाठी अनधिकृत, बिगरमान्यताप्राप्त बीटी किंवा तण सहनसील बीटी बियाण्यांचा वापर केल्याची बाब केंद्र शासनाने यापूर्वीच मान्य केली आहे. काही बियाणे कंपन्यांनी बीटी कपाशीपासून (एफ १) बियाणे तयार करून (एफ २) ते शेतक-यांच्या माथी मारले. यामध्ये पहिल्या पिढीतील (एफ १) बियाण्याप्रमाणेच दोन्ही प्रकारची जनुके (१८1अू + १८2अु) असतीलच याची खात्री नसते. जनुकशास्त्रानुसार ९:३:३:१ या प्रमाणात दुस-या पिढीत जनुके परावर्तीत होतात. यानुसार दुसºया पिढीत ९ बोंडांमध्ये दोन्ही प्रकारचे जनुके तर प्रत्येकी ३ मध्ये एकेका प्रकारचे जनुके उतरले असतात व एका बोंडात कोणतेच जनुके नसतात हे पीक बोंडअळीला फारसे प्रतिकारक्षम नसल्यानेही बोंडअळीचा उद्रेक वाढला.

१२० दिवसांनंतर जनुकांच्या प्रतिकारक्षमतेत घट
दीर्घ कालावधीचे संकरित वाण बोंडअळीला स्थिरावण्यास मदत करतात. फुल वफळधारणा वेगवेगळळ्या वेळी सुरूच राहत असल्याने सतत बोंडअळीला खाद्य उपलब्ध असते व जानेवारीनंतर बीटीला पाणी दिले जाते, ही अत्यंत धोकादायक बाब ठरत आहे. अळीचे जीवनचक्र सुरूच राहते. महत्त्वाचे म्हणजे बीटी १२० दिवसांची झाल्यावर तिच्यातील अंगभूत असलेल्या जनुकांची प्रतिकारक्षमता कमी होत जाते व पीक किडीला बळी पडते.

Web Title: Increased immunity for bollworm, ISCI and SABC report, with the use of 'pyrethride' overuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.