शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:10+5:302021-07-03T04:10:10+5:30

चांदूर रेल्वे : शहरामध्ये वाढलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव तसेच अशुद्ध पाणीपुरवठा बाबत स्थानिक शिवसेना शहरप्रमुख स्वप्नील मानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक ...

Increasing incidence of dengue in the city | शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव

शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव

Next

चांदूर रेल्वे : शहरामध्ये वाढलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव तसेच अशुद्ध पाणीपुरवठा बाबत स्थानिक शिवसेना शहरप्रमुख स्वप्नील मानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच शहरात डुकरांची वाढती संख्या पाहता डुकरांचा तत्काळ बंदोबस्त न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा शुक्रवारी देण्यात आला.

चांदूर रेल्वे शहरामध्ये डेंग्यू तापाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या शहराची आरोग्यव्यवस्था रामभरोसे चालू आहे असे दिसते. याशिवाय गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नाही आहे. अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही सुस्त प्रशासनाला जाग आलेल्या नाही. एकंदरीत शहरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय शहरामध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार दिसत आहे. लोकांनी घेतलेले फळे, भाजीपाला व इतर खाण्याचे साहित्य गाडीला लटकवून ठेवले असता किंवा कापडी डिक्कीमध्ये ठेवले असता डुकरे त्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहे. तसेच वस्तीमध्ये डुकरांचा रोडवर मुक्तसंचार दिसत आहे. त्यामुळे दुर्घटना वाढलेल्या आहेत. तसेच लोकांच्या घरात सुध्दा शिरत असुन साथीच्या रोगांना निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख स्वप्नील मानकर, किशोर यादव, राजेंद्र मेटे, आशुतोष म्हसतकर, अरविंद बेलसरे, अर्पित देशमुख, राजेंद्र मोरे, शुभम देशमुख, संदीप जरे, राजेश चौधरी, अभिनव घोंगडे, गौरव शेळके आदींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

(फोटो ओळ - चांदूर रेल्वे - विविध मागण्यांचे निवेदन न. प. अभियंता यांना देतांना शिवसेना कार्यकर्ते)

020721\img-20210702-wa0055.jpg

photo

Web Title: Increasing incidence of dengue in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.