मनरेगा योजनेत महिला मजुरांचा वाढताेय सहभाग

By जितेंद्र दखने | Published: September 27, 2023 06:50 PM2023-09-27T18:50:21+5:302023-09-27T18:50:49+5:30

कामांची मागणी वाढली; २७३ रुपये प्रतिदिन मोबदला.

increasing participation of women laborers in MGNREGA scheme | मनरेगा योजनेत महिला मजुरांचा वाढताेय सहभाग

मनरेगा योजनेत महिला मजुरांचा वाढताेय सहभाग

googlenewsNext

जितेंद्र दखने, अमरावती : अल्प मजुरी, स्थानिक पातळीवर कामांची वानवा अशा अनेक अडचणी असूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) महिलांसाठी गरजेची ठरली असून गेल्या काही वर्षांत या योजनेत महिलांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनरेगा अंतर्गत जिल्ह्यासह राज्यात २०२१-२२ या वर्षात एकूण मनुष्य दिवस निर्मितीमध्ये ४३.६७ टक्के इतका महिलांचा सहभाग होता. तर २०२२-२३ या वर्षात तो ४४.७२ टक्क्यांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षात तो सद्यस्थितीत ४५ टक्के इतका आहे. रोजगार हमी योजनेत पुरुष आणि महिलांना समान वेतन दिले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी महिला देखील शेती हंगाम संपल्यानंतरच्या काळात रोहयोच्या कामात सक्रिय होत आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रौढ व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबास किमान १०० दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देण्यात येते. योजनेमध्ये महिलांचा किमान ३३ टक्के सहभाग असणे गरजेचे आहे. पण, त्याहून अधिक सहभाग सातत्याने दिसून आला आहे.

एकीकडे जीवनावश्यक वस्तूंमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात २५६ रुपये प्रतिदिवस मजुरीत मजुरांना काम करणे परवडेनासे झाले होते. १ एप्रिल केंद्र २०२३ पासून मजुरीत प्रतिदिवस १७ रुपयांनी वाढ केली. आता २७३ रुपये प्रतिदिवस मजुरी मिळत आहे.

रोहयो कामावरील मजूर उपस्थिती

रोहयोत जिल्हाभरात ३१२१ कामे सुरू आहेत. यात २६ सप्टेंबर रोजी १६ हजार २५९ मजूर कामावर आहेत. यात अचलपूर तालुक्यात १५३१, अमरावती १ हजार, अंजनगाव सुर्जी ३४३, भातकुली ३८७, चांदूर रेल्वे ४६३, चांदूर बाजार १९१९, चिखलदरा ३३८२, दर्यापूर ६८१, धामणगाव रेल्वे ५४४, धारणी १२३१, मोर्शी २३६३,नांदगाव खंडेश्वर ३५७, तिवसा ८१४ आणि वरूड १२४४ याप्रमाणे रोहयो कामावर मजूर उपस्थिती आहे.

Web Title: increasing participation of women laborers in MGNREGA scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.