कोरोना संकटात एसटीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:01:10+5:30
कोेरोना संसर्ग लक्षात घेता. २३ मार्च पासून एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह इतर सात आगारामध्ये पाच महिन्यांपासून शुकशुकाट होता. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बसेसेवा सुरू केली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बसेसची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, या आठही बसस्थानकाहून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून बसेसच्या फेऱ्या ये-जा करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसला सध्या सण-उत्सवामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.काही दिवसापूर्वी महामंडळाने जिल्हातंर्गत बसेस सोडल्यानंतर आता आंतरजिल्हा बससेवा सुरू केलीे. यामध्ये मंगळवारी जिल्ह्यातील आठ आगाराच्या बसव्दारे ८,१५९ प्रवाशांनी प्रवास केलेला आहे . यापोटी महामंडळाला ५ लाख २५ हजार ६९७ रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले.
कोेरोना संसर्ग लक्षात घेता. २३ मार्च पासून एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह इतर सात आगारामध्ये पाच महिन्यांपासून शुकशुकाट होता. पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बसेसेवा सुरू केली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बसेसची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, या आठही बसस्थानकाहून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरून बसेसच्या फेऱ्या ये-जा करीत आहेत. याचा प्रसार व प्रचार गावोगावी झाला. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील प्रवाशांचा लालपरीला प्रतिसाद लाभत आहे.
सध्या अनेक प्रवाशी कामानिमित्त एसटी बसेसव्दारे प्रवास करीत आहे. मंगळवारी ८,१५९ प्रवाशांनी बसव्दारे प्रवास केलेला आहे. महामंडळाने दिवसभरात ३१८ फेऱ्या सोडल्या आहेत. यामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याने दिवसभरात ५ लाख २५ हजार ६९७ रूपयाचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांचा दिवसेदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे विभाग नियंत्रक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारी वरून दिसून आले.
आगार निहाय प्रवाशी संख्या
अमरावती १९६१, बडनेरा १५७९, परतवाडा ९९९, वरूड १००७, चांदूर रेल्वे ७४६, दर्यापूर ६५८, मोर्शी ७१७, चांदूर बाजार ५१२ याप्रमाणे ८१५९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
आंतरजिल्हा बस वाहतुक सुरू केलेली आहे. सध्या प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. बसेसला प्रवाशाचा प्रतिसाद लक्षात घेता बस फेºया सोडल्या जात आहे. मंगळवारी ५ लाखांवर उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे.
- श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक