अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन, हातवारे करून विनयभंग
By प्रदीप भाकरे | Published: June 18, 2023 01:32 PM2023-06-18T13:32:28+5:302023-06-18T13:32:43+5:30
उशिरा रात्री त्या दाम्पत्याने मुलींना घेऊन पोलीस ठाणे गाठले.
अमरावती: एका अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करून, हातवारे करून तिचा विनयभंग करण्यात आला. १६ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो प्रकार घडला. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी १७ जून रोजी रात्री आरोपी कैलास भीमराव पाठक (५५) व एका महिलेविरूध्द विनयभंग, शिविगाळ व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे एक दाम्पत्य राशन कार्ड काढण्या करीता भातकुली येथे गेले होते. ते शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास घरी परतले. तेव्हा दोन्ही मुली घाबरलेल्या स्थितीत दिसल्या. त्यामुळे महिलेने मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन तिला विचारणा केली. त्यावेळी घटनेचे बिंग फुटले. तक्रारीनुसार, ती अल्पवयीन मुलगी घराबाहेर काम करीत असतांना आरोपी कैलास पाठक हा तिच्या घरासमोर आला. व हाताने ईशारे करुन त्याने तिच्याशी अश्लिल वर्तन केले. त्याने हातवारे करून तिला बोलावले. त्यानंतर तो घरी निघून गेला. त्यामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली.
सायंकाळी पाचच्या सुमारास तो पुन्हा परतला व त्याने हातवारे करत त्या मुलीला पुन्हा बोलावले. मात्र ती गेली नाही. हा सर्व प्रकार कळल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीची आई आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यावेळी एका महिलेने त्या महिलेस शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शुक्रवारी उशिरा रात्री त्या दाम्पत्याने मुलींना घेऊन पोलीस ठाणे गाठले.