स्वातंत्रदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष

By admin | Published: August 17, 2016 12:00 AM2016-08-17T00:00:24+5:302016-08-17T00:00:24+5:30

स्वातंत्र्यदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष अमरावतीकरांना हैराण करणारा ठरला. कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने अक्षरशा नागरिक वैतागले होते.

Independence Day Celebration Belgaum Celebs | स्वातंत्रदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष

स्वातंत्रदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष

Next

कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने नागरिक हैराण : अनेक ठिकाणी किरकोळ अपघात

अमरावती : स्वातंत्र्यदिनी तरुणाईचा बेलगाम जल्लोष अमरावतीकरांना हैराण करणारा ठरला. कर्कश हॉर्नच्या गोंगाटाने अक्षरशा नागरिक वैतागले होते. ठिकठिकाणी किरकोळ अपघात घडून अनेक जण जखमी सुध्दा झालेत. त्यामुळे असाही स्वातंत्र दिन साजरा करण्याची पद्धत तरुणाई असू शकते, असे शब्द अमरातीकरांच्या तोंडून निघालेत. या बेलगाम जल्लोषावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीसही हतबल झाल्याचे चित्र सोमवारी शहरात पहायला मिळाले.
भारताला स्वातंत्र्य मिळविण्यात अनेकांनी प्राण पणाला लावलेत, स्वातंत्र्याचा लढा देत अनेक शहीद झालेत. त्यामुळे आज सर्वसामान्य स्वातंत्र्यपूर्व जीवन जगू शकत आहेत. मात्र, आधुनिक युगातील तरुणाईने स्वातंत्र्यदिनीच सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार केलेत. सोमवारी पहाटेपासून शहरात स्वातंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. शाळा-महाविद्यालयांत शांततेचा संदेश देत झेंड्याला सलामी देण्यात आली. मात्र, सळसळणाऱ्या तरुणाईने स्वातंत्र्याची परिभाषाच बदलविल्याचे आढळले. दुचाकींचे ताफेच्या ताफे रस्त्यावर भरधाव चालवून कर्कश हॉर्नचा गोंगाट करीत भन्नाट तरुणाईने शहरात उच्छादच मांडल्याचे चित्र पहायला मिळाले. या कर्कश हॉर्नमुळे अनेकांच्या कानठळ्यासुध्दा बसल्या होत्या. मात्र, या तरुणाईच्या जल्लोषाला थांबविणारी पोलीस यंत्रणाच कुचकामी झाली होती.
शहरातील प्रत्येक मार्गावर दुचाकीस्वाराच्या हॉर्नचा गोंगाट सहन करण्यासारखाच नव्हता. दुचाकींचे ताफे भरधाव रस्त्यावरून जात असताना कोणीही आडवे आल्यास त्याला धडक देत समोर जायचे. हा प्रकारही अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र, हा दुचाकीस्वारांच्या हैदासाला थांबविणारी पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भुमिका घेऊन उभी होती. अनेक ठिकाणी तर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनी हैदोसच घातला होता. जीवाची पर्वा न करीत तरुणाचा हा जल्लोष अमरावतीकरांच्या स्मरणात राहण्यासारखाच आहे. त्यामुळे स्वातंत्र दिनाचा असाही जल्लोष असू शकतो, असे शब्द अमरावतीकरांच्या मुख्यातून आपसूक निघत होते.
शहरात २२ ठिकाणी किरकोळ अपघात
बेलगाम दुचाकीस्वारांच्या कल्लोळात शहरातील २२ ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याची माहिती आहे. इर्विन चौकात बुलेट रॅलीदरम्यान एक दाम्पत्याच्या दुचाकीला कट बसला आणि ते दाम्पत्या चिमुकल्यासह खाली कोसळले. नवाथे नगरात दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने नाल्यात कोसळले. राजकमल चौकात सुध्दा चार ते पाच दुचाकी घसरल्या. पंचवटी चौकातसुध्दा दुचाकींची समोरासमोर धडक झाली. असे प्रकारचे २२ अपघात शहरात घडलेत.

जल्लोषासाठी ट्रॅफिक जाम
दुचाकीस्वाराचा सोमवारी संपूर्ण शहरात जल्लोष दिसून आला. शेकडो तरुणाईने रस्त्यावरच वाहने उभे करून हॉर्नचा गोंगाट व जल्लोष केला. संपूर्ण रस्ता अडवून हा जल्लोष सुरु असल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामसुध्दा झाली होती. याबाबत अनेक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्कही केला. मात्र, पोलीस विभागाकडून तत्काळ मदत मिळाली नाही, असे प्रकार अनेक ठिकाणी घडले.

स्वातंत्र्यदिनी शहरातील मिरवणुका, वाहतुकीची कॅमेराद्वारे छायाचित्रिकरण करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, ते छायाचित्रिकरणातून उघड होईल. यामध्ये दोषी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त, अमरावती.

Web Title: Independence Day Celebration Belgaum Celebs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.