नीळकंठ माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:39+5:302021-08-19T04:16:39+5:30
-------------------------- राजमुद्रा अभ्यासिकेद्वारा पर्यावरण संवर्धन अभियान अमरावती : साईनगर स्थित आरंंभ शैक्षणिक व सामाजिक संस्थाद्वारा संचालित राजमुद्रा अभ्यासिकातर्फे ७५ ...
--------------------------
राजमुद्रा अभ्यासिकेद्वारा पर्यावरण संवर्धन अभियान
अमरावती : साईनगर स्थित आरंंभ शैक्षणिक व सामाजिक संस्थाद्वारा संचालित राजमुद्रा अभ्यासिकातर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पर्यावरण संवर्धन अभियानाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित फुकटे, प्रमुख अतिथी प्रा. प्रवीण गेडाम, माजी उपशिक्षणाधिकारी चौधरी होते. समाजात पर्यावरणाबद्दल जागरुकता वाढावी, हा यामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्वेश पिंप्राळे, कुणाल कंठाळे, माधुरी शेळके, ओम गुप्ता, अक्षय कतोरे, धीरज गाडगे, भूषण कारिया, महेश भुरे आदींनी परिश्रम घेतले.
-----------------------
कोरोनायोद्ध्यांच्या हस्ते ध्वजारोहण
(फोटो आहे)अमरावती : कठोरा स्थित गोविंदराव आदिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोनायोद्धा मृणाल बोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्टमध्ये त्यांनी सेवा दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.