विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:23+5:302021-09-16T04:17:23+5:30
फोटो पी १५ पाटील अमरावती : छत्री तलाव येथे मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. या ...
फोटो पी १५ पाटील
अमरावती : छत्री तलाव येथे मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कार्याची पाहणी उपायुक्त सुरेश पाटील यांनी केली. यावेळी अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, उपकेंद्रप्रमुख सैयद अनवर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले व अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करण्याची सूचना त्यांनी केली.
गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्यविषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जनस्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, विसर्जनस्थळी प्राथमिक आरोग्य पथक अँम्बुलन्ससह सज्ज ठेवणे तसेच विसर्जनस्थळी आवश्यक ठिकाणी पाण्यावरील गाळ व कचरा काढावा. आर्टीफिशियल टँक ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन विभागाला विसर्जनस्थळी अग्निशमन पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.