चांदुरात महिलांसाठी ‘स्वतंत्र मार्केट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:34 PM2017-11-14T23:34:39+5:302017-11-14T23:34:58+5:30

शहरात महिलांसाठी स्वतंत्र मार्केट व्यवस्था असावी अशी मागणी पालिका सदस्यांच्या चर्चेमधून समोर आली होती.

'Independent market' for women in Chandur | चांदुरात महिलांसाठी ‘स्वतंत्र मार्केट’

चांदुरात महिलांसाठी ‘स्वतंत्र मार्केट’

Next
ठळक मुद्देसर्व सूत्र महिलांकडेच : विकासाकामांचा नगराध्यक्षांनी दिला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : शहरात महिलांसाठी स्वतंत्र मार्केट व्यवस्था असावी अशी मागणी पालिका सदस्यांच्या चर्चेमधून समोर आली होती. त्यानुसार दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच मंजुरी मिळेल. येत्या दीड वर्षात अत्याधुनिक सोर्इंनी युक्त महिलांचे मार्केट उभे राहिल, विशेष म्हणजे या बाजाराची व्यवस्था व व्यावसायिक महिला असतील, अशी माहिती चांदूर बाजारचे नगराध्यक्ष रवींद्र पवार यांनी दिली.
शहाराच्या विकासकामांचा आढावा त्यांनी मंगळवारी नगरपालिकाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रपरिषदेतून मांडला. नगराध्यक्ष पवार म्हणाले, शहराचा आठवडी बाजार हा ऐतिहासिक आहे. अतिक्रमणामुळे बाजाराचे ऐतिहासिक स्वरूप आज मोडकळीस आले आहे. नवे रूप साकारताना या आठवडी बाजारात कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही याची व्यवस्था केली जाईल. मटन मार्केटचा प्रश्न संवेदनशील झाला असून येत्या सहा महिन्यात हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढू. यासाठी मोर्शी रोडवर ३५ लाख रुपयांचे नवीन मार्केट बांधले जात असल्याचे ते म्हणाले.
पत्रपरिषदेला उपाध्यक्ष लविना आकोलकर, शिक्षण सभापती गोपाल तिरमारे, बांधकाम सभापती आनंद अहिर, मनीष नांगलिया, चंदा खंडारे, मीरा खडसे, वैशाली घुलक्षे, विजय विल्हेकर, अतुल रघुवंशी, गणेश खडके, रवींद्र राऊत, रवींद्र जाधव उपस्थित होते.
शहरातील चार शाळा डिजिटल
सद्या दोन कोटी रूपयांची विकासकामे सुरू असून येत्या दोन महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त दोन कोटीच्या कामांचाही शुभारंभ होईल. सत्ता सांभाळण्यास लवकरच वर्षपूर्ती होणार आहे. या काळात आम्ही तांत्रिक अडचणीमुळे असलेली मागील कामे पूर्णत्वास नेली आहेत. तसेच नगरपालिकेच्या चार प्राथमिक शाळा ह्या डीजीटल केल्या आहेत. पाणी पुरवठ्याची वसुली ९५ लाखांवरून ४० लाखावर आणली आहे. निवृत्त कर्मचाºयांना ३० लाखाचा दहा वर्षापासूनचा थकीत रकमा दिल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

Web Title: 'Independent market' for women in Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.