विद्यापीठात इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:01 PM2019-02-05T22:01:13+5:302019-02-05T22:01:36+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मंचावर आयआयडीएफ सांस्कृतिकी, भुवनेश्वरचे महोत्सव निदेशक शामहरी चक्रा, कलाशिखर फाऊन्डेशनचे अध्यक्ष भैयासाहेब मेटकर, सचिव शीतल मेटकर, हेमंत नृत्य-कला मंदिराचे सचिव मोहन बोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक दिनेश सातंगे, रशियाच्या सुप्रसिद्धी ओडिसी नृत्यांगणा विटालीना लोबच, सोफया कुखारीनोक उपस्थित होत्या.
वर्तमानकाळात प्रत्येकाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुलभता, प्रसन्नता यावी आणि आनंद मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे आहे. इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल सगळ्यांना आनंद देईल, असे मत कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाचा घटक म्हणून आम्ही अशा कार्यक्रमाची वाट पाहत होते. चांगली मेजवानी, आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मिळणार आहे. वातावरण बदलू शकते, असा हा कार्यक्रम आहे. आनंदी वातावरणात जगण्याची संधी या निमित्ताने सर्वांना प्राप्त झाली आहे. यापूर्वीसुद्धा विद्यापीठाने लोककला महोत्सव, आदिवासी नृत्य अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम विद्यापीठात घेण्याची संधी आयोजकांनी दिल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमामध्ये वृक्ष व पुस्तक देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा शीतल मेटकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. आभार शीतल मेटकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला माजी कुलगुरू जी.व्ही. पाटील, आयआयएलचे संचालक डी.टी. इंगोले, रवींद्र सरोदे यांच्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रशियाच्या नृत्यांगणाने वेधले लक्ष
रशियाच्या सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा सोफया कुखारीनोक यांनी सोलो प्रकारात उत्कृष्ट ओडिसी नृत्य सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.