'इंडियन फ्लेप शेल' कासवांची जंगलात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:19 PM2018-12-04T22:19:02+5:302018-12-04T22:19:24+5:30

कठोरा परिसरात आढळलेल्या 'इंडियन फ्लेप शेल' प्रजातीच्या कासवांना वसा संस्थेने वनविभागाच्या सहकार्याने जंगलात मुक्त करून जीवनदान दिले. कासव बंदिस्त करून ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कासवांना बंदिस्त करून न ठेवता आम्हाला माहिती द्यावी, असे आवाहन वसा संस्थेने केले आहे.

'Indian flame shell' will be released in the forest of Tasva | 'इंडियन फ्लेप शेल' कासवांची जंगलात रवानगी

'इंडियन फ्लेप शेल' कासवांची जंगलात रवानगी

Next
ठळक मुद्देवसा संस्थेची कामगिरी : वनविभागाचेही सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कठोरा परिसरात आढळलेल्या 'इंडियन फ्लेप शेल' प्रजातीच्या कासवांना वसा संस्थेने वनविभागाच्या सहकार्याने जंगलात मुक्त करून जीवनदान दिले. कासव बंदिस्त करून ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कासवांना बंदिस्त करून न ठेवता आम्हाला माहिती द्यावी, असे आवाहन वसा संस्थेने केले आहे.
स्थानिक कठोरा परिसरातील कल्पना नगरातील रहिवासी वसंत चक्रे यांना घरासमोरील रस्त्यावर दुपारच्या सुमारास कासव दिसला, रस्त्यावर अपघात होऊ नये, म्हणून त्यांनी कासवाला घरी आणले. नंतर वसा संस्थेला माहिती देऊन कासव संस्थेकडे सुपूर्द केला. वसाचे गणेश अकर्ते, अनिमल्स रेस्क्युअर निखिल फुटाणे व सागर फुटाणे यांनी त्या कासवाला वनविभागाच्या मदतीने ताब्यात घेतले. दुसऱ्या एका घटनेत राजापेठ परिसरातील शंकर नगरात अशोककुमार तेजवाणी यांना घरासमोरील नालीमध्ये कासव आढळून आला. त्यांनी वसाच्या निखिल फुटाणे यांना फोन द्वारे माहिती दिली, त्यांनी अनिमल्स रेस्क्युअर मुकेश वाघमारे, गणेश अकर्ते आणि रोहित रेवाळकर यांना सोबत घेऊन कासवाला ताब्यात घेतले. चार दिवसांच्या निरीक्षणानंतर दोन्ही कासवांची पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे डॉ. अनिल कळमकर व डॉ. कुलकर्णी यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकार प्रतिबंधक पथकाचे अधिकारी एस.के. वाजगे, वनरक्षक फिरोज खान, वीरेंद्र उज्जैनकर, किशोर खडसे आणि शूटर अमोल गावनेर यांनी पंचनामा करून वसाचे भूषण सायंके आणि शुभम सायंके यांच्या समक्ष दोन्ही कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
कासवांना विहिरीत बंदीस्त करू नका
नागरिकांनी शौका खातीर कासवांना विहिरीत बंदीस्त करणे चुकीचे आहे. घरात किंवा विहिरीत कासव ठेवणे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दंडनीय अपराध आहे. भारतात आढळणाºया सर्व जातीच्या कासवांना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सुधारणा कायदा २००२ नुसार संरक्षण प्राप्त असल्याची माहिती वसातर्फे शुभम सायंके यांनी दिली.
वसाच्या अभियानाला अमरावतीकरांचे सहकार्य
नागरिक त्यांच्या घरातील, विहिरीतील, त्यांना आढळलेल्या कासवांची माहिती द्यावी, कासवांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याआधी सेंटरवर काही दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यानंतर वन विभागाच्या मदतीने कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करत आहोत. नागरिकांनी कासवांबाबत माहिती वसाच्या ९९७०३५२५२३ आणि ९५९५३६०७५६ या रेस्क्यू हेल्पलाईन वर द्यावी.
दोन्ही कासव इंडियन फ्लेप शेल जातीचे
दोन्ही कासव हे इंडियन फेल्प शेल (गोड पाण्यातील नरम पाठीचे कासव) असल्याची पुष्टी वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे, जयदीप मेहता आणि शुभम सायंके यांनी केली. हे कासव प्रामुख्याने नदी, ओढ्यात तसेच तलावात आढळतात. मात्र अन्नाच्या शोधात ते पुष्कळ वेळा मनुष्य वस्तीत आढळत असल्याची माहिती वसाचे निखिल फुटाणे यांनी दिली.

Web Title: 'Indian flame shell' will be released in the forest of Tasva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.