इंदला गावानजीकच्या विहिरीत अर्धवट जळालेला औषधीसाठा आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:58+5:302021-06-04T04:10:58+5:30

अमरावती/ मनीष तसरे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावानजीकच्या शेतातील एका अर्धवट बांधकाम केलेल्या विहिरीत अपूर्ण जळालेले आठ ते १० ...

Indla found a partially burnt stock of medicine in a well near the village | इंदला गावानजीकच्या विहिरीत अर्धवट जळालेला औषधीसाठा आढळला

इंदला गावानजीकच्या विहिरीत अर्धवट जळालेला औषधीसाठा आढळला

Next

अमरावती/ मनीष तसरे

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत इंदला गावानजीकच्या शेतातील एका अर्धवट बांधकाम केलेल्या विहिरीत अपूर्ण जळालेले आठ ते १० पोते औषधीसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

यातील काही औषधांची मुदतसुद्धा संपायची आहे. त्यामुळे हा साठा येथे कुणी आणला? कशासाठी फेकून दिला? याचा शोध पोलिसांनी व औषधी प्रशासन विभागाने घ्यावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

प्राप्तमाहितीनुसार, शिवाजी किरकटे, मंगेश कोकाटे व बिजवे हे इंदला गावानजीकच्या शेतात ले-आऊट पडले आहे. या ले-आऊटमधील प्लॉट बघण्याकरिता गुरुवारी दुपारी ते गेले होते. परिसरात फिरत असताना त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना आठ ते १० पोत्यांमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत औषधीसाठा आढळून आला. त्यांनी याची माहिती ‘लोकमत’ला दिली. ‘लोकमत’ने घटनास्थळी भेट दिली असता, औषधीसाठ्यांपैकी काही औषधांची मुदत २०२२ पर्यंत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर औषधी कशासाठी फेकण्यात आल्या? त्या कालबाह्या आहे का? जर असतील तर अशाप्रकारे उघड्यावर फेकणे नियमबाह्य नव्हे काय? याचा तपास पोलीस व एफडीएच्या अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी होत आहे.

बॉक्स: हा साठा आढळला

विहिरीत आढळलेल्या औषधीसाठ्यामध्ये इंजेक्शन, विविध कंपन्यांच्या औषधींच्या ट्रिप्स, कंडोम व इतरसाठा आढळून आला.

कोट

घटनास्थळी पोलिसांना जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषधीसाठा ताब्यात घेवून एफडीएच्या माध्यमातून त्याची पडताळणी करण्यात येईल यात कुणी दोषी आढळल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल.

आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती

कोट

सदर औषधीसाठा उघड्यावर फेकणे नियमबाह्य आहे. घटनास्थळी भेट देवून पाहणी करण्यात येईल. औषधीसाठा हा एका खासगी कंपनीला देवून तो वेगळ्या पद्धतीने नष्ट करण्यात येतो.

मनिष गोमतारे औषधी निरीक्षक अमरावती.

Web Title: Indla found a partially burnt stock of medicine in a well near the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.