भातकुली येथील मिनी एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:00 AM2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:16+5:30
खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना संधी दिली, तर खारपानपट्यातील शेतकरी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ६५ एकर जागा भातकुली तालुक्याकरिता मंजूर आहे. या एमआयडीसीला जवळपास पस्तीस वर्षे झाली. परंतु, अद्यापही येथे एकही उद्योग सुरू झालेला नाही.
खारपाणपट्ट्याच्या भातकुलीला लागून गणोरी, आसरा, उत्तमसरा, गणोजादेवी, दाढी-पेढी आदी मोठी गावे आहेत. या गावांतील तरुणांना येथे प्लॉट मिळायला हवे होते. तथापि, येथील तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आदी शहरे गाठतात. या गावातील तरुणांना संधी दिली, तर खारपानपट्यातील शेतकरी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने येथे आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध केल्या, तर तरुण तेथे छोटे-मोठे उद्योग टाकण्यास सुरुवात करतील. मोठ्या शहरांत रोजगारासाठी जाणारा युवकांचा लोंढा उद्योगात गुंतवावा, अशी मागणी होत आहे.
२३ प्लॉट कुणाला?
भातकुली एमआयडीसीमधील १५.७८ हेक्टरवर २३ प्लॉट पाडण्यात आले आहेत. पण, ते कुणाला अॅलॉट केले आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.