सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:26+5:302021-07-03T04:09:26+5:30

अमरावती : जिल्ह्यातील काही तालुक्यांत विशेषत: चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पिकावरील केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. वेळीच व्यवस्थापन करण्याच्या सूचना ...

Infestation of hairy larvae on soybeans | सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

Next

अमरावती : जिल्ह्यातील काही तालुक्यांत विशेषत: चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पिकावरील केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे.

वेळीच व्यवस्थापन करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. चिखलदरा तालुक्यातील बहादूरपूर व टेंभुरसोंडा शिवारात सोयाबीन पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव गेल्या आठवड्यापासून दिसून येत आहे. ही कीड डोंगराळ व वन क्षेत्राजवळील पिकांत प्रथम आक्रमण करते. नंतर इतर ठिकाणी पसरते. ही बहुभक्षी कीड असून, पूर्ण वाढलेली अळी ४० ते ४५ मिमी लांब असते. तिची दोन्ही टोके काळी व मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूला राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरून पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास त्या झाडांचे खोडच शिल्लक राहते. नंतर त्या दुसऱ्या शेतात जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

बॉक्स

ही उपाययोजना करा

पेरणी व्हावयाची असेल त्यांनी प्रथम सोयाबीन बियाण्याला रासायनिक बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम ३० टक्के एफ. एस. १० मिली प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, प्रादुर्भावाच्या ठिकाणी अंडीपुंज असलेली पाने, तसेच जाळीदार पाने त्यातील असंख्य अळ्यांसह गोळा करून त्या रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावी. प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणी ४० ते ५० प्रतिहेक्टरी पक्षीथांबे उभारावेत.

बॉक्स

ही फवारणी आवश्यक

प्रतिमीटरवर ४ ते ५ अळ्या आढळून आल्यास इमामेक्टिन बेंझोएट १.९ टक्के इसी ८.५ मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १५.८ टक्के ईसी, ६.७ मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड ३९.३५ टक्के एस. सी. ३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकेल. हे प्रमाण साध्या पंपाचे आहे. पॉवर स्प्रेअरने फवारणी करायची असल्यास प्रमाण तिप्पट करावे, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे म्हणाले.

Web Title: Infestation of hairy larvae on soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.