धामणगाव तालुक्यातील ६५ गावांत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:21+5:302021-04-23T04:13:21+5:30

मोहन राऊत धामणगाव रेल्वे : जगासह देशभरात अनेक ठिकाणी कोरोनाने कहर केला आहे. धामणगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असताना ...

Infiltration of corona in 65 villages of Dhamangaon taluka | धामणगाव तालुक्यातील ६५ गावांत कोरोनाचा शिरकाव

धामणगाव तालुक्यातील ६५ गावांत कोरोनाचा शिरकाव

Next

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : जगासह देशभरात अनेक ठिकाणी कोरोनाने कहर केला आहे. धामणगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असताना तालुक्यातील १७ गावांनी अद्याप गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नसल्याने आता या गावांनी यापुढील काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तालुक्यातील ६५ गावे कोरोना बाधित झाली असून, त्यातील सोनेगाव, हिरपूर ही गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. शहरासह ग्रामीण भागातील वाढलेले रुग्ण संख्या व मृत्यूचे आकडे हे चिंताजनक ठरत आहेत. आतापर्यंत धामणगाव तालुक्यात १,२०० व्यक्ती बाधित झाले आहेत.

तालुक्यातील ८२ पैकी ६५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव वेगाने झाला. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व एक ग्रामीण रुग्णालय आहे. पहिल्या लाटेच्या काळात तालुक्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचलेला नव्हता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. प्रशासनाने सध्या लक्ष केंद्रित केले असले तरी, या ठिकाणचा संसर्ग रोखताना मात्र नाकीनऊ येत आहेत. प्रशासनामार्फत गावचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हॉटस्पॉट असलेली गावे मात्र अजून चांगल्या पद्धतीने अ‍ॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. या ठिकाणी कोरोनाचा फैलाव रोखणे प्रशासनाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

बाधित ६५ गावे

धामणगाव रेल्वे शहरात ४४१, तळेगाव ४५, देवगाव ३, जळगाव आर्वी ४६, तिवरा ९, कामनापूर (घुसळी) २, शेंदुर्जना ९, आसेगाव २७, जळका पट ९, भिल्ली १, काशिखेड ६, सावळा २, नारगावंडी ७, दिपोरी १, मलातपूर २, वाढोणा १, अंजनसिंगी १०, अंजनवती १, पिंपळखुटा ४', जुना धामणगाव १२१, हिरापूर ६, ढाकुलगाव ४, गव्हा निपाणी ८, गव्हा फरकाडे १२, अशोकनगर १६, रामगाव ४, वडगाव राजदी ४, वडगाव बाजदी २, तरोडा १, गंगाजळी १, विरुळ रोंघे ४०, मंगरुळ ३५, खानापूर ४, वाठोडा १, दाभाडा ७, नायगाव ५, जळगाव १३, गोकुळसरा ५, दिघी ३, वरूड व बगाजी ५, कावली २, निंबोली ४, कासारखेड १२, निंभोरा बोडखा १३, निंभोरा राज ४, तळणी ९, विटाळा १, गिरोली ८, सोनेगाव खर्डा ५४, परसोडी २२, बोरवघळ ३, वाघोली १३, झाडा ३, हिंगणगाव १, भातकुली १, ओकनाथ ३, बोरगाव धांदे ६, आष्टा ३, जानकपूर ५, चिंचोली ९, आजनगाव ९ व हिरपूर येथील ८१ व्यक्तींचा समावेश आहे.

--

Web Title: Infiltration of corona in 65 villages of Dhamangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.