सणासुदीत गृहिणींना महागाईचा ठसका; मसाला खढ टक्क्याने महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:56+5:302021-08-21T04:16:56+5:30

उत्पादनात झालेली घट, वाढता ट्रान्सपोर्टेशन खर्च, यासह अनेक कारणांमुळे त्याचा थेट परिणाम महागाईतून समोर येतो आहे मसाला ज्यापासून तयार ...

Inflation hits housewives during festivals; Spice prices up by one per cent! | सणासुदीत गृहिणींना महागाईचा ठसका; मसाला खढ टक्क्याने महागला!

सणासुदीत गृहिणींना महागाईचा ठसका; मसाला खढ टक्क्याने महागला!

Next

उत्पादनात झालेली घट, वाढता ट्रान्सपोर्टेशन खर्च, यासह अनेक कारणांमुळे त्याचा थेट परिणाम महागाईतून समोर येतो आहे मसाला ज्यापासून तयार न्लाल्या जातो त्या काळीमिरी, खसखस, जायपत्री कलमी यांच्या दरात वाढ झाली आहे. जेवण तसेच विविध पदार्थ चवदार बनविण्यामध्ये मसाल्यांचा महत्त्वाचा रोल असतो ऐन सणासुदीच्या काळात त्यात झालेली दरवाढ घरातील आर्थिक बजेट बिघडवणारी झाली आहे. महागाईवर अंकुश असले पाहिजे, अशा प्रतिक्रिया महिला वर्गांमध्ये खास करून आहेत. किचनमध्ये वापरणाऱ्या वस्तूंची सतत दरवाढ होत असल्याने कुटुंबाचा गाढा कसा चालवायचा, हा प्रश्न अनेकांना भेडसावणारा ठरतो आहे.

---

प्रतिक्रिया-

* महागाई पाठ सोडेना!

1) कोरोणामुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत अनेकांचे रोजगार हिरावले आहे घरखर्च कसा चालवावा या विवंचनेत असताना महागाईचा होणारा भडका गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडवणारे आहे शासनाने महागाईवर नियंत्रण आणावे.

संध्याबाई रामटेके

गृहिणी.

2) किराणा मालाच्या सर्वच वस्तूंमध्ये सारखी होत असणारी दरवाढ थांबली पाहिजे कोरोणामुळे लोक त्रस्त आहेत अनेकांचे रोजगार थांबले आहेत आता कुठे काहीसा दिलासा मिळाला असताना मात्र महागाई विवंचना वाढविणारी आहे त्यावर नियंत्रण आणले पाहिजे.

अनिता पाईकराव

गृहिणी.

---

प्रतिक्रिया-

* म्हणून वाढलेत दर

1) किराणा वस्तूंमध्ये दरवाढ कमी अधिक होत असते मसाला ज्यापासून तयार होतो त्यापैकी काही वस्तूंची दरवाढ अलीकडे झालेली आहे अत्यावश्यक असल्याने ग्राहकीवर त्याचा परिणाम झालेला नाही.

सुरेन्द्रकुमार खंडेलवाल

व्यापारी, अमरावती.

2) मसाला ज्यापासून तयार होतो त्यातील खसखसचे भाव बरेच वाढले आहेत मात्र विलायचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे दरवाढ कमी अधिक होत असते मसाल्याच्या काही वस्तूमध्ये 25 टक्के दरवाढ दिसून पडते आहे.

फिरोजभाई अकबानी

व्यापारी, अमरावती.

----

मसाला। जुनेदर। नवेदर(किलोमध्ये)

काळीमिरी ३८० रु। ४४० रु

खसखस ९०० रु। १७०० रु

लवंग। ६०० रु। ८०० रु

जायपत्री। १८०० रु। २००० रु

खोबरे। ९० रु। १६० रु

कलमी। २५० रु। ३२० रु

तेजपान। ७५ रु। १२५ रु

शाहजीरा। ४५० रु। ५०० रु

Web Title: Inflation hits housewives during festivals; Spice prices up by one per cent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.