रेमडिसिविर इंजेक्शनसंर्दभात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:01+5:302021-04-13T04:12:01+5:30

अमरावती जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांत ४,००० व्हायल उपलब्ध आहेत. याशिवाय ४०० व्हायल येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलला(पीडीएमएमसी) ...

Information regarding Remedicivir Injection | रेमडिसिविर इंजेक्शनसंर्दभात माहिती

रेमडिसिविर इंजेक्शनसंर्दभात माहिती

Next

अमरावती जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांत ४,००० व्हायल उपलब्ध आहेत. याशिवाय ४०० व्हायल येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलला(पीडीएमएमसी) उसणवार देण्यात आलेले आहे. शहरात २३ खासगी कोविड हॉस्पिटल आहेत. त्यांचे मेडिकल स्टोअर्समध्ये सोमवारी सिपला कंपनीचे ३५० व्हायल उपलब्ध झाल्याचे एफडीएने सांगितले. नागपूर डेपोकडे २,००० व्हायलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मंगळवारी पुन्हा काही प्रमाणात रेमडिसिविर व्हायल उपलब्ध होणार असल्याचे एफडीएने सांगितले.

जिल्ह्यात सोमवारी कोविशिल्डचे २०,००० डोस उपलब्ध झालेत. ते प्रत्येक तालुक्याला एक हजार याप्रमाणे वितरित करण्यात आले. महापालिका क्षेत्रासाठी पाच हजार डोस देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात सध्या १२५ पैकी सहा केंद्रे सुरू आहेत. हा पुरवठा फक्त दोन दिवस पुरेल इतका आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचे डोस निरंक आहेत.

रेमडिसिविर इंजेक्शनची मारामार असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना चढ्या किमतीतही मिळेनासे झाले आहे. रोज एक डोस होईल एवढाच पुरवठा सद्यस्थितीत होत आहे.

Web Title: Information regarding Remedicivir Injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.