शेतकऱ्यांच्या कर्जप्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:02:09+5:30

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अनावश्यक कागदपत्रे न मागण्याबाबत १६ जुलै रोजी आदेश काढला असतानासुद्धा बँकेकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांद्वारा प्राप्त होत होत्या. त्यामुळे बुधवारी भाजयुमो कार्यकर्ते बँकेत धडकले. शाखा प्रबंधकांशी झालेल्या बोलणीनंतर त्यांनी सातबारा, ८-अ व आधार कार्ड याशिवाय पात्र शेतकऱ्यांकडून कोणतीही कागदपत्रे मागणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले.

Initiation of farmer loan process | शेतकऱ्यांच्या कर्जप्रक्रियेला प्रारंभ

शेतकऱ्यांच्या कर्जप्रक्रियेला प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देखानापुरात भाजयुमोचे आंदोलन : अनावश्यक कागदपत्रे मागणार नसल्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनानंतर तालुक्यातील खानापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्यावतीने शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रे न मागता, कर्जप्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.
खानापूर येथे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजिंक्य लुंगे व सरचिटणीस गौरव आखरे यांच्या नेतृत्वात यासंबंधी निवेदन देण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना बँक आॅफ महाराष्ट्रकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी सातत्याने केली जात होती. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी भाजयुमोकडे प्राप्त झालेल्या होत्या. कर्जाकरिता शेतकऱ्यांकडून मागविण्यात येत असलेल्या अनावश्यक कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाकडे दररोज चकरा मारूनसुद्धा ती मिळत नव्हती. त्यामुळे तहसील कार्यालयात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होत होती.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अनावश्यक कागदपत्रे न मागण्याबाबत १६ जुलै रोजी आदेश काढला असतानासुद्धा बँकेकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांद्वारा प्राप्त होत होत्या. त्यामुळे बुधवारी भाजयुमो कार्यकर्ते बँकेत धडकले. शाखा प्रबंधकांशी झालेल्या बोलणीनंतर त्यांनी सातबारा, ८-अ व आधार कार्ड याशिवाय पात्र शेतकऱ्यांकडून कोणतीही कागदपत्रे मागणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर लगेच उपस्थित १० ते १५ शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना नवीन कर्ज मिळवून देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यामुळे खानापूर, चिखलसावंगी, आष्टगाव, उदखेड, वरला, खोपडा, बोडणा येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला.
याप्रसंगी आष्टगाव येथील मनीष इंगळे, बलराम द्विवेदी, गौरव आखरे, प्रवीण पांडे, साहेबराव बडाळे, उज्ज्वल भडांगे, खोपडा येथील प्रवीण वानखडे, पंकज खडसे, वैभव उकंडे, राजेश चिखले व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Initiation of farmer loan process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.