विलगीकरण कक्षासाठी माहेश्वरी हितकारक संघाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:39+5:302021-05-15T04:11:39+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने येथील माहेश्वरी हितकारक संघाने विलगीकरणासाठी केंद्र तयार केले आहे. माहेश्वरी हितकारक संघाच्या ...
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने येथील माहेश्वरी हितकारक संघाने विलगीकरणासाठी केंद्र तयार केले आहे. माहेश्वरी हितकारक संघाच्या संकल्पनेतून माहेश्वरी समाजासाठी 'सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
माहेश्वरी समाजातील कोणाला घरगुती विलगीकरणात राहावे लागल्यास घरातील इतरांची अडचण होऊ नये, यासाठी माहेश्वरी भवन क्रमांक २ च्या बंद सदनिकांमध्ये अशाप्रकारे विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे किमान २० खाटा विलगीकरणासाठी उपलब्ध आहेत. याठिकाणी आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि विलगीकरणासाठी गरजेच्या बहुसंख्य वस्तूसाठी माहेश्वरी हितकारक संघाच्या सदस्यांनी हातभार लावला आहे. या कार्यासाठी माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष मनीष मुंधडा, उपाध्यक्ष प्रसन्न भंडारी, सचिव गिरीश भुतडा, सहसचिव दीपक राठी, कोषाध्यक्ष सुभाष मुंधडा, कार्यकारिणी सदस्य दीपक केला, तरुण राठी, राजेश झंवर, राधेश्याम मुंधडा, प्रवीण पनपालिया, योगेश मुंधडा, आकाश पनपालिया, अभय मुंधडा, संतोष राठी, दर्शन राठी, राधेश्याम चांडक, प्रवीण पनपालिया यांचे योगदान लाभले.