‘माझ्या बळीराजा’साठी उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा; कृषिमंत्र्यांचा साद्राबाडीला शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 02:13 PM2022-08-31T14:13:23+5:302022-08-31T14:16:25+5:30

कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे.

initiative of 'Mazhya Baliraja' starts from melghat, Agriculture Minister abdul sattar stay at farmer's house in Sadrabadi | ‘माझ्या बळीराजा’साठी उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा; कृषिमंत्र्यांचा साद्राबाडीला शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

‘माझ्या बळीराजा’साठी उपक्रमाचा मेळघाटातून श्रीगणेशा; कृषिमंत्र्यांचा साद्राबाडीला शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

googlenewsNext

अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

या उपक्रमासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी कृषिमंत्री साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे १ सप्टेंबरला ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा’साठी उपक्रमात कृषिमंत्री पटेल यांच्या शेतावर पोहोचून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता धारणी येथील पंचायत समितीसमोरील परिसरात १० हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ व प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कृषी अधिकारी देणार महिन्यातून तीन भेटी

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा’साठी या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक व इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: initiative of 'Mazhya Baliraja' starts from melghat, Agriculture Minister abdul sattar stay at farmer's house in Sadrabadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.