पहिल्या शंभरात येण्यासाठी ‘स्वच्छतेचा आग्रह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 10:59 PM2017-09-09T22:59:16+5:302017-09-09T22:59:51+5:30

केंद्र शासनाकडून यंदा होणाºया स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.

'Initiatives for cleanliness' to come in the first century | पहिल्या शंभरात येण्यासाठी ‘स्वच्छतेचा आग्रह’

पहिल्या शंभरात येण्यासाठी ‘स्वच्छतेचा आग्रह’

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : पूर्वतयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाकडून यंदा होणाºया स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. त्या तयारीचा एक भाग म्हणून १५ सप्टेंबरला मुंबई येथे अमरावती विभागातील नागरी स्थानिक संस्थासाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ंआयुक्त हेमंत पवार यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावर जानेवारी २०१८ मध्ये होणाºया स्वच्छ सर्वेक्षणात किमान पक्षी पहिल्या शंभरात येण्यासाठी महापालिका यंत्रणेने स्वच्छाग्रहाचा संकल्प सोडला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१७ या स्पर्धेत अमरावती शहर तब्बल २६३ व्या क्रमांकावर राहिले होते. घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया केंद्र उभारणीमध्ये कमी पडल्याने महापालिका बॅकफुटवर आली होती. त्यानंतर प्रशासन आणि पदाधिकाºयांमध्ये मंथन होऊन यंदाच्या सर्वेक्षणात किमान पहिल्या १०० मध्ये येण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यापार्श्वभूमिवर वैयक्ति क, सामुदायिक, सार्वजनिक स्वच्छतागृहासह सार्वजनिक स्थळांवरच्या सर्वंकष स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. सुकळी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासह झोनस्तरावर २५ टन क्षमतेचे छोटे प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी अकोली आणि बडनेरा येथिल जागा निश्चित करण्यात आल्या असून डीपीआर बनविला जाणार आहे.
अमरावती महापालिकेने वैयक्तिक, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची रोकॉर्डब्रेक उभारणी केली आहे. मात्र त्यानंतरही अनेक भागात नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने त्यांचेवर नियंत्रण राखण्याचे आव्हान महापालिकेला पेलायचे आहे.
सुकळीचा प्रकल्प ठरला पांढरा हत्ती
मोठा गाजावाजा करुन सुकळी येथे प्लास्टिक प्रोसेंसिंगचा युनिट उभारण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तो प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाचा स्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये महापालिकेला गुणांकन मिळविण्यात कुठलाही लाभ झाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याचे आव्हान महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे असेल.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या पूर्व तयारीसाठी १५ सप्टेंबरला राज्य शासनाने मुंबई येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यात घनकचरा व्यवस्थापनासह अन्य मुद्यांवर नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव मार्गदर्शन करणार आहेत.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त, महापालिका

Web Title: 'Initiatives for cleanliness' to come in the first century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.