जखमी सापावर महिनाभर उपचार, नंतर सोडले जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:51+5:30
हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी हरणटोळ बघू शकत नव्हता. परिणामी हेल्प फाऊंडेशनचे अभिषेक भाकरे, अजय यादव यांनी त्याला पशू चिकित्सालयात उपचारासाठी नेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील जळू या गावात विचित्र असा हिरवा साप आढळला. त्याच्या मणक्याला जबर मार बसल्याने दोन्ही डोळ्यांना संक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वनविभागाच्या मदतीने हरणटोळ या सापावर महिनाभर उपचार केल्यानंतर बुधवारी जंगलात सोडले. हेल्प फाऊंडेशनने यात मोलाची कामगिरी बजावली.
हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी हरणटोळ बघू शकत नव्हता. परिणामी हेल्प फाऊंडेशनचे अभिषेक भाकरे, अजय यादव यांनी त्याला पशू चिकित्सालयात उपचारासाठी नेले होते. पशू शल्यचिकित्सक देवराव हटकर यांनी उपचार केले. त्याच्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पशू शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्याअनुषंगाने वनविभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. महिनाभर उपचारानंतर विभागाच्या मदतीने पोहरा जंगलात त्याला सोडण्यात आले. यात सुमेध गवई, अक्षय इंगळे, शुभम गायकवाड, अजय दोर्वेकर, अतिश भिमके, पवन देशमुख आदींची बरेच श्रम घेतले. यापूर्वी हेल्प फाऊंडेशनने अजगर, कोब्रा, धामण, घोणस आदी जातीचे सापांवर उपचार करून सुखरूप जंगलात सोडले आहे.
हरणटोळ हा साप ११ जानेवारी रोजी जळू गावच्या परिसरात आढळून आला. तो जखमी असल्याने त्याचेवर उपचार करण्यात आला. शासकीय पशू शल्यचिकित्सकांच्या देखरेखीत उपचार करू न तो बरा झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोहरा जंगलात सोडले.
- रत्नदीप वानखडे
अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन अमरावती.