विद्युतीकरणाच्या दोन वर्षांतील कामांची होणार चौकशी

By admin | Published: May 4, 2016 12:27 AM2016-05-04T00:27:28+5:302016-05-04T00:27:28+5:30

जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हाभरात करण्यात आलेल्या विद्युतीकरण व दुरुस्तीच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीने घेतला आहे.

Inquiry will be done in two years of electrification | विद्युतीकरणाच्या दोन वर्षांतील कामांची होणार चौकशी

विद्युतीकरणाच्या दोन वर्षांतील कामांची होणार चौकशी

Next

बांधकाम समितीचा निर्णय : एक महिन्यात अहवाल सादर
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हाभरात करण्यात आलेल्या विद्युतीकरण व दुरुस्तीच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीने घेतला आहे. याबाबत मोहन सिंगवी, निशांत जाधव यांनी याबाबत वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर याची दखल घेण्यात आली नाही. या विषयावर ३ मे रोजी बांधकाम समिती सभेत या विषयावर चांगलेच वादळ उठले
जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्याात वर्षभरात विविध योजनेतून नवीन प्राथमीक आरोग्य केद्र, उपकेंद्र, शाळा बांधकाम, पंचायत समिती इमारत, तीर्थक्षेत्र विकास व अन्य प्रकारची कामे करताना या कामासोबतच विद्युतीकरणाचीसुध्दा कामे केली जातात. याशिवाय देखभाल दुरूस्तीसुध्दा करण्यात येते. मात्र या कामात मोठी अनियमितता झाली असल्याने याविरोधात आता काही सदस्यांनी आक्षेप घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मागील दोन वर्षांत करण्यात आलेल्या कामांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी बांधकाम समितीने केली आहे. यावर कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणारी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नाही. त्यामुळे दुसऱ्या यंत्रणेच माध्यमातून ही चौकशी करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सभेत ३०५४ या लेखाशिर्षातील सन २०१६-१७ साठी सहा उपविभागापैकी पाच उपविभागाने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र धारणी उपविभागाचा प्रस्ताव अद्याप आला नाही. त्यामुळे कामे थांबल्याने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. यावेळी सभेला बांधकाम सभापती गिरीश कराळे, सदस्य मोहन सिंगवी, विक्रम ठाकरे, प्रवीण घुईखेडकर, विनोद डांगे, कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, उपअभियंता आर.आर. पवार, साकोरे, ठाकरे, लढे, शेखर भुताड, डेहनकर, ठाकून, राजेश रायबोले, राजेश अडगोकार, प्रभाकर नाल्हे, आर.जे. बारेदार, पी.बी. पोकळी, राजेश ब्रदे, एम.आर. बेग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वर्षभरापासून रखडली
विश्रामगृहाची दुरूस्ती
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चिखलदरा येथील विश्रामगृहाच्या दुरूस्तीचे काम एसआरएलमधून मागील वर्षी मंजूर करण्यात आले होते. या कामासाठी बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यतासुध्दा प्रदान केली. मात्र या कामासाठी तब्बल वर्षभरापासून या कामाच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विश्रागृहाचे काम सुरू झाले नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत नव्याने निविदा काढण्याचे आदेश चिखलदरा येथील उपअभियंत्यांना दिले आहेत.

Web Title: Inquiry will be done in two years of electrification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.