उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:28 PM2018-07-02T23:28:28+5:302018-07-02T23:29:40+5:30

जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषी विभागाने करावी, उगवणक्षमता नसल्यास तत्काळ उपाययोजना करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यांनी दिले.

Inspect germination seeds | उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करा

उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करा

Next
ठळक मुद्देकृषी आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषी विभागाने करावी, उगवणक्षमता नसल्यास तत्काळ उपाययोजना करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यांनी दिले. जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान उपस्थित होते.
तक्रार करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
ज्यांनी शेतामध्ये बियाणे पेरले परंतु ते उगवलेच नाही, अशा शेतकºयांनी कृषी केंद्रातून बियाणे विकत घेतले त्या देयकाची पावती आवर्जून प्राप्त करुन घ्यावी. पंचनाम्यासाठी सातबारा, पेरेपत्रक, बियाणे खरेदीची पावतीसह लेखी तक्रार कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी किंवा पालकमंत्री यांना थेट भेटून अथवा संपर्क करुन तक्रार करावी.

Web Title: Inspect germination seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.