जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांद्वारा कंटेन्मेट झोनची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:09+5:302021-02-20T04:37:09+5:30
अमरावती : अलीकडे कोरोनाचा हॉटस्पाट ठरलेल्या साईनगर परिसरातील कंटेन्मेंट झोनची जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी ...
अमरावती : अलीकडे कोरोनाचा हॉटस्पाट ठरलेल्या साईनगर परिसरातील कंटेन्मेंट झोनची जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशा रुग्णांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाणार आहे. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. त्यांच्यावर घरावर ठळक अक्षरात फलक लावून कुटुंबातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणी करावी. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्यांकडून बंधपत्र लिहून घ्यावे. उल्लंघन करताना दुसऱ्यां आढळून आल्यास त्याच्याकडून २५ हजार दंड वसूल करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच संबंधितांच्या मालमत्ता करात हा दंड नमूद केला जाऊन वसूल केला जाणार आहे. त्याचे काटेकोर पालन होत नसल्यास किंवा संबंधितांनी यासाठी नकार दिल्यास त्यांना कोविड सेंटरला भरती करावे. घरोघरी सर्वेक्षण करून ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
साईनगर, अकोली गाव, साईमंदिर परिसर, अकोली चौक परिसरात जिल्हाधिकाऱ्यां नागरिकांशी संवाद साधला व त्यांना त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
बॉक्स
सोमवार अन् शुक्रवारी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील सोमवार बाजार व शुक्रवार बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश उपायुक्त सुरेश पाटील यांनी शुक्रवारी बजावले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हे आदेश देण्यात आले.
बॉक्स
महापालिका क्षेत्रात सहा ठिकाणे स्वॅब सेंटर
महापालिका क्षेत्रात आरटी-पीसीआर व रॅपीड अॅन्टीजेन तपासणीकरिता आयसोलेशन दवाखाना व नेहरू मैदान येथील शाळेत स्वॅब सेंटर सुरू होते. आता नागरिकांच्या सुविधेकरिता विलासनगरातील १७ नंबरची शाळा, नागपपुरी गेट येथील शाळा, बडनेरा नवी वस्तीतील पोलीस स्टेशनमागील शाळा व विदर्भ आर्युवेद महाविद्यालयात केंद्र सुरु करण्यात आले.