मुंबई विद्यापीठाकडून परीक्षा विभागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:08 PM2018-07-31T22:08:46+5:302018-07-31T22:09:53+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील चार सदस्यीय चमुने भेट दिली. दरम्यान या चमुने परीक्षा प्रणाली, आॅनलाइन निकाल, संगणकीय कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
Next
ठळक मुद्देचार सदस्यीय चमुची भेट : गोंधळ सावरण्यासाठी अभ्यास दौरा
लोकमत
न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील चार सदस्यीय चमुने भेट दिली. दरम्यान या चमुने परीक्षा प्रणाली, आॅनलाइन निकाल, संगणकीय कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या चमूला परीक्षा आणि निकालासंदर्भात माहिती दिली. मुंबई विद्यापीठात गतवर्षी परीक्षा आणि निकालात गोेंधळ उडाला होता. त्यावेळी कुलगुरूंना पायउतार व्हावे लागले होते. यापुढे अशी वेळ येऊ नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने सावध पवित्रा उचलला आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव फरडे यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती विद्यापीठाच्या परीेक्षा विभागात भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आयसीआर अंतर्गत परीक्षा विभागातील संगणक प्रणालीची माहिती नासीर खान यांनी या चमुला दिली. परीक्षा विभागात आॅनलाइन निकाल, मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासह चारही विभागाच्या उपकुलसचिवांसोबत या चमुने संवाद साधला. अमरावती विद्यापीठाने परीक्षेशी निगडित ‘एन्ड टू एन्ड’ कामे एजन्सीकडे सोपविली. त्यामुळे आॅनलाईन परीक्षा आणि निकाल हे अमरावती विद्यापीठाची आता जमेची बाजू ठरत आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे तत्कालीन संचालक जयंत वडते यांच्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात प्रारंभ केलेल्या विविध उपक्रमांची मुंबई विद्यापीठाने दखल घेतल्यामुळे हा गौरव मानला जात आहे. मुंबई चमूत उपकुलसचिव फरडे यांचेसह सहायक मैयनुद्दीन शेख, सहायक कुलसचिव अशोक घुले, प्रभारी नियंत्रक राकेश तांबे यांचा समावेश होता.
परीक्षा विभागाने हे राबविले उपक्रम
परीक्षा विभागाने आॅनलाईन वेळापत्रक, पूनर्मूल्यांकनासाठी सॉफ्टवेअर, आॅनलाईन एसएमएस, सीसीटीव्ही कॅमेरे, सारणी तक्त्यांचे डीजीटलायझेशन, गुणपत्रिका व पदवीप्रमाण पत्राचे आॅनलाइन प्रक्रियेद्वारे अपलोडींग, महाविद्यालय स्तरावर परीक्षा समन्वयक, उत्तर पत्रिकांचे बारकोड, परीक्षा केंद्रांना आॅनलाईन प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांसाठी टोल फ्री क्रमांक, आचार्य पदवीकरिता नवीन अध्यादेश, पीएच.डी. पेट परीक्षेकरिता आॅनलाईन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि परीक्षा अर्ज आॅनलाईन, परीक्षा विभागात गेट वे प्रणाली, केंद्रीय मूल्यांकन विभागात लिफ्टची सुविधा आदी उपक्रम राबविले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या चमुने परीक्षा विभागात तीन तास घालविले. परीक्षा आणि मूल्यमापनाबाबत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाची बारकाईने माहिती जाणून घेतली. हे विद्यापीठासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती