वनक्षेत्रातील पाणवठ्यांची लिटमस पेपरने तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:14+5:30
नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : उन्हाळ््यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काहीच न आटणारे नैसर्गिक जलस्रोत आणि बहुतांश कृत्रिम पाणठ्यांवर अवलंबून राहावे लागते. या पाणवठ्यांवर विषप्रयोग होऊ शकतो, या शक्यता लक्षात घेऊन दररोज लिटमस पेपरने वनकर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.
नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्याकरिता वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आपआपल्या वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांना पाणवठ्यांची नियमित, काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना वनकर्मचाºयांना दिल्या आहेत.
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वनविभागाची सावधागिरी
गुलाबी रंगाचा असलेला लिटमस पेपर पाण्यात टाकल्यास, विषाक्त पाण्यात पेपर निळ््या रंगाचा होतो. परंतु, जर पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषप्रयोग केलेला नसल्यास गुलाबी रंगाचा लिटमस पेपर तपासणीदरम्यान गुलाबीच राहतो. यावरू न युरिया किंवा कुठलाही विषप्रयोग केला असल्यास वनकर्मचाऱ्यांना माहिती होते. वन्यप्रण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लिटमस पेपरने आता दरदिवसा पाणवठ्यांची तपासणी केली जात आहे.
वडाळी वर्तुळात चार कृत्रिम पाणवठे, पोहरा वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, चिरोडी वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, तर बडनेरा, माळेगाव, चांदूर रेल्वे वर्तुळात नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या बरीच आहे. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये भर उन्हाळ््यात मुबलक पाणी उपलब्ध आहे.