आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी १४ तालुक्यातील गावांची जिल्हास्तरीय चमूकडून तपासणी

By जितेंद्र दखने | Published: March 1, 2024 10:42 PM2024-03-01T22:42:09+5:302024-03-01T22:43:51+5:30

१ ते १२ मार्च या कालावधीत केली जाणार पाहणी

Inspection of villages in 14 talukas by district level team for RR Patil beautiful village award | आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी १४ तालुक्यातील गावांची जिल्हास्तरीय चमूकडून तपासणी

आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी १४ तालुक्यातील गावांची जिल्हास्तरीय चमूकडून तपासणी

जितेंद्र दखने - अमरावती: राज्य शासनाने आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधील प्रत्येकी एक याप्रमाणे १४ गावांची जिल्हास्तरीय समितीमार्फत १ ते १२ मार्च या कालावधीत केली जाणार आहे. या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी असून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत आदीचा या समितीमध्ये समावेश आहे.

ही समिती आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या १४ गावांची तपासणी केली जात आहे. या स्पर्धेसाठी शासनाने निकष दिले आहेत. त्यानुसार स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठी केलेले प्रयत्न आदींसाठी गुणांकन दिले जाणार आहे. १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी शासनाने निकष दिले आहेत. त्यानुसार स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठी केलेले प्रयत्न आदींसाठी गुणांकन दिले जाणार आहे. १०० गुणांमधून सर्वाधिक गुण मिळणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

ही आहेत स्पर्धेतील गावे

कठोरा बु. (ता. अमरावती), साहुर (भातकुली), सुरवाडी (ता. तिवसा), अशोकनगर (धामणगाव रेल्वे), हातुर्णा (वरूड) पार्डी (ता. मोर्शी), येरंडगाव (ता. नांदगाव, खंडेश्वर), मालखेड (ता. चांदूर रेल्वे), चंडीकापूर व टोंगलाबाद संयुक्त ग्रामपंचायत (ता. दर्यापूर), कारला (ता. चांदूर, अंजनगाव सुजी), राणीगांव (ता. धारणी), सलोना (ता. चिखलदरा), वणी बेलखेडा (ता. चांदूर बाजार), वागडोह (ता. अचलपूर), आदी तालुक्यातील १४ गावांची तपासणी सीईओ संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती करीत आहे.

Web Title: Inspection of villages in 14 talukas by district level team for RR Patil beautiful village award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.