राज्यस्तरीय समितीतर्फे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:23 AM2018-03-19T01:23:20+5:302018-03-19T01:23:20+5:30
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत द्विसदस्यीय राज्यस्तरीय तपासणी समितीत असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या चमूने १७ मार्च रोजी अमरावती विभागात प्रथम आलेल्या अचलपूर पंचायत समितीची सकाळी, तर दुपारी जिल्हा परिषदेत यशवंत पंचायतराज अभियानांंतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत द्विसदस्यीय राज्यस्तरीय तपासणी समितीत असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या चमूने १७ मार्च रोजी अमरावती विभागात प्रथम आलेल्या अचलपूर पंचायत समितीची सकाळी, तर दुपारी जिल्हा परिषदेत यशवंत पंचायतराज अभियानांंतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली.
राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी शासनाची पुरस्कार योजना आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन २०१७-१८ अंतर्गत पंचायत राज संस्थांच्या २०१६-१७ मधील कामकाजावर आधारित पुरस्कार दिले जातात. यासाठी विभागातून अमरावती जिल्हा परिषद आणि अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीची विभागीयस्तरीय तपासणीसाठी निवड झाली होती.
विभागीय तपासणी समितीने वरील दोन पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेची तपासणी १ मार्च रोजी यवतमाळ येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड या द्विस्तरीय समितीकडून तपासणी केली आहे. यावेळी निकषानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची विभागीय स्तरावरीय तपासणीत कागदपत्रांच्या छाननीद्वारे गुणांची पडताळणी करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर केल्यानंतर विभागात अमरावती जिल्हा परिषद व अचपूर पंचायत समितीने बाजी मारली आहे. त्यानंतर आता राज्यस्तरीय समितीमार्फत ही तपासणी करण्यात आली आहे.
तपासणीचा अंतिम अहवाल राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर केला जाणार आहे. या तपासणीच्या वेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यपालन अधिकारी कै लास घोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, विस्तार अधिकारी प्रमोद ताडे आदी उपस्थित होते.
हिगोलींच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तपासणीची प्रक्रिया द्विसदस्यीय राज्यस्तरीय समितीत असलेले हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अ. मुकीम देशमुख, पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ नितीन दाताळ आदीचा समावेश होता. त्यांना सहकारी म्हणून हिंगोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी पी.जी. गोटीकर, विस्तार अधिकारी जी.पी. काळे आणि कनिष्ठ सहायक एल.बी. क्षीरसागर आदींच्या चमूने पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली .