छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजेंची प्रेरणा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:59 PM2017-12-29T22:59:04+5:302017-12-29T22:59:26+5:30
रयतेचे राज्य यावे, यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांचे ऋण फेडा,...
आॅनलाईन लोकमत
अमरावती : रयतेचे राज्य यावे, यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांची प्रेरणा घेऊन आई-वडिलांचे ऋण फेडा, असे कळकळीचे आवाहन पुणे येथील शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी शुक्रवारी येथे केले.
स्थानिक रुख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दोनदिवसीय श्री शिवशाही महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, नगरसेवक दिनेश बूब, प्रणीत सोनी, चेतन गावंडे, अर्चना धामणे, भैया पवार, अरविंद गावंडे, प्रवीण तायडे, भूषण फरतोडे आदी उपस्थित होते.
यशवंत गोसावी पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास विलासी प्रवृती, रंगेल असा वेगळा मांडला गेला. छत्रपती संभाजीराजे नेमके कसे होते, हे युवा पिढीला कधी कळू शकलेच नाही. त्यामुळे संभाजींचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर औरंगजेबाचा इतिहास वाचा. मुघलांना थरकाप आणणारे असे संभाजीराजे होते. अतिशय पराक्रमी, शूर असे ते होते. संभाजीराजांनी अवघ्या २४ व्या वर्षी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. हा खरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्या पराक्रमांची गाथा मांडताना गोसावी यांनी सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक वाटचालीकडे लक्ष वेधले. शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचे शौर्य, पराक्रमाचा आलेख मांडताना, आपणही या समाजाचे काही तरी देणं लागतो, ही भावना त्यांनी उपस्थितांच्या मनात रुजवली. मुलांना शिकवा - कलेक्टर, अधिकारी बनवा. थोरांचे विचार आत्मसात करून मुलांना आई-वडिलांची सेवा, आदर करण्याची शिकवण द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुलांचे हट्ट, लाड पुरवा, पण त्यांच्या मनात वाईट प्रवृतीचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घ्या. एकवेळी शिवाजी, संभाजीचा आदर करू नका, पण आई-वडिलांचा आदर करा, असे भावनिक आवाहन त्यांनी तरुणाईला केले. श्री शिवशाही महोत्सवातून खºया अर्थाने सामाजिक प्रबोधन होत असल्याची भावनादेखील यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक आयोजक भूषण फरतोडे यांनी केले. संचालन क्षीप्रा मानकर यांनी केले. राष्ट्रवंदनेने सांगता झाली.