निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्ड
By admin | Published: February 2, 2015 10:57 PM2015-02-02T22:57:15+5:302015-02-02T22:57:15+5:30
ज्येष्ठ नागरिकांना असणारी एसटी प्रवास सवलत यापुढे निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्डावर मिळणार आहे. याविषयीचे धोरण स्पष्ट करीत महामंडळाने जिल्ह्यातील सर्व
ज्येष्ठ नागरिक सवलत : परिवहन महामंडळाने बदलले धोरण
अमरावती : ज्येष्ठ नागरिकांना असणारी एसटी प्रवास सवलत यापुढे निवडणूक ओळखपत्राऐवजी आधारकार्डावर मिळणार आहे. याविषयीचे धोरण स्पष्ट करीत महामंडळाने जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांना आदेश निर्गमित केले आहे.
महामंडळाचे राज्यात असणाऱ्या १८३ पेक्षा केवळ २० डेपो नफ्यात आहेत. महामंडळाला मागील वर्षात १२०० कोटींचा तोटा सहन करावा लागला. केंद्र सरकार वाहतूक व्यवस्थेविषयी नव्याने कायदा करुन खाजगी बसेसला प्रवासी वाहतुकीचे परवाने खुले करणार आहे. राज्य सरकार मात्र याविषयीचा कुठलाही कायदा करणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे.
आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये मतदार ओळखपत्रावर प्रवास सवलत दिली जात होती. मात्र यापुढे आधारकार्डाच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. (प्रतिनिधी)
महामंडळाचा चेहरामोहरा बदलणार
बसस्थानक परिसरात खाजगी वाहने येऊ नयेत यासाठी सर्व आगारात स्वयंचलीत गेट लावण्यात येणार आहे. सर्व एसटी डेपो पंचतारांकित करण्यात येणार आहे. प्रसाधान गृह आधुनिकतेचा वापर केला जाणार आहे. १० ते १४ वर्षांच्या विद्यार्थिनींना एसटीच्या मागच्या दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन शेवटचे आसन त्यांच्यासाठी राखीव राहणार आहे. अपंगांसोबत एका सहकाऱ्याला असणारी विनातिकीट प्रवास करण्याची सवलत बंद करण्यात येणार आहे.