ई-पीक पाहणीऐवजी केंद्र शासनाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे! रब्बी हंगामात पश्चिम विदर्भातील १५ गावांमध्ये अंमलबजावणी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 15, 2023 07:23 PM2023-12-15T19:23:24+5:302023-12-15T19:23:55+5:30

सध्या पश्चिम विदर्भातील १५ गावांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Instead of e-peak inspection, the central government's digital crop survey Implementation in 15 villages of West Vidarbha during Rabi season | ई-पीक पाहणीऐवजी केंद्र शासनाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे! रब्बी हंगामात पश्चिम विदर्भातील १५ गावांमध्ये अंमलबजावणी

ई-पीक पाहणीऐवजी केंद्र शासनाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे! रब्बी हंगामात पश्चिम विदर्भातील १५ गावांमध्ये अंमलबजावणी

अमरावती : राज्य शासनाच्या ई-पीक पाहणीद्वारे गतवर्षीपासून ऑनलाइन पीक पेरा नोंदविण्यात येत आहे. मात्र एक-दोन वर्षात ही पद्धत बंद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी केंद्र शासनाच्या डिजिटल क्राॅप सर्व्हे अॅपद्वारे पीक नोंदविण्यात येणार आहे. सध्या पश्चिम विदर्भातील १५ गावांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 जमाबंदी विभागाच्या अॅपच्या तुलनेत काही अद्यावत बदल केंद्र शासनाच्या अॅपमध्ये करण्यात आलेला आहे. याशिवाय एक खासगी सहायकदेखील नियुक्त करण्यात आलेला आहे. तो शेतकऱ्यांना या अॅपद्वारे ऑनलाइन पीक पेरा नोंदविण्यास बदल करेल. 

अमरावती जिल्ह्यात गोंडविहीर, रहीमापूर, संभेगाव, यवतमाळ जिल्ह्यात नेरळ, निब्बो, ब्राह्मणवाडा पूर्व, अकोला ाजिल्ह्यात बिरसिंगपूर, ताकवाडा, चिखलवाड, बुलडाणा जिल्ह्यात अफजलपूर, वडाळी, देउळखेड, व वाशिम जिल्ह्यातील कुऱ्हाड, कानडी व वडप यागावांत केंद्र शासनाचा डिजिटल क्राप सर्व्हे अॅप हा पायलट प्रोजेक्टर राबविण्यात येत आहे.
 

Web Title: Instead of e-peak inspection, the central government's digital crop survey Implementation in 15 villages of West Vidarbha during Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.