ग्रामीण यंत्रणनेने उपाययोजना करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:09+5:302021-05-16T04:13:09+5:30

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा ...

Instructions to be taken by the rural system | ग्रामीण यंत्रणनेने उपाययोजना करण्याचे निर्देश

ग्रामीण यंत्रणनेने उपाययोजना करण्याचे निर्देश

Next

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या काळात ग्रामीण भागात बाधितांची वाढती संख्या पाहता ग्रामीण यंत्रणांनी तसेच ग्रामस्तरीय समित्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असून, त्यात ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्य शासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार सुविधांची तजवीज करतानाच सर्व डॉक्टरांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपचार सुविधांची ठिकठिकाणी नव्याने उभारणी करण्याची गरज लक्षात घेऊन शासन व प्रशासनाकडून तसा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका आदींनी एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले यंत्रणेला दिले आहेत.

बॉक्स

लक्षणे जाणवताच उपचार आवश्यक

कोरोनाकाळात ग्रामीण आरोग्य यंत्रणेने लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळीच ‘प्रीव्हेंटिव्ह’ उपचार सुरू करावे, जेणेकरून जोखीम कमी होईल. जिल्ह्यात लस, ऑक्सिजन, रेमडेसिविरचे व्यवस्थापन जिल्हा यंत्रणेकडून होत आहे. गरजेनुसार ही सर्व सामग्री उपलब्ध करून घेण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना अधिक धोका असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्णही आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जाणीवजागृती करणे, लक्षणे आढळणाऱ्यांना वेळीच उपचार मिळवून देणे व होम आयसोलेशनमधील बाधितांशी आरोग्य यंत्रणेने नियमित समन्वय ठेवणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बॉक्स

बेजबाबदार व्यक्तीवर वेळीच कारवाई करा

गृह विलगीकरणातील व्यक्तीने विहित कालावधीत विलगीकरणात राहून उपचार घेणे आवश्यक असते. लक्षणे नसलेली व्यक्ती विलगीकरणात न राहता घराबाहेर पडल्यास त्यांच्यापासून इतरांना धोका होऊ शकतो. अशी एखादी बेजबाबदार व्यक्ती ऐकत नसेल व स्वत:सह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असेल, तर वेळीच पोलीसांना माहिती द्यावी. ग्रामस्तरीय समित्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी ग्रामीण पोलीस यंत्रणेला दिले.

Web Title: Instructions to be taken by the rural system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.