भूमी अभिलेखकडून मोजणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:33+5:302021-05-25T04:14:33+5:30
अमरावती:२४ : कोरोना साथीमुळे संचारबंदी लागू असली तरीही कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणची मोजणीची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण ...
अमरावती:२४ : कोरोना साथीमुळे संचारबंदी लागू असली तरीही कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणची मोजणीची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
संचारबंदी काळात सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत.मोजणीची प्रलंबित काम सर्वप्रथम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत. याबाबत जिल्हाधिका-यांनी निर्मगित केलेल्या आदेशात नमूद आहे की, मोजणीस्थळी केवळ पाच नागरिक उपस्थित राहतील. मोजणी कर्मचारी, भूधारक आदी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करावे. मोजणी अर्जदार जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेरील असेल तर शासनाच्या निर्देशानुसार लागू नियम त्याच्यावर बंधनकारक असतील. क्लस्टर व कंटेनमेंट झोनमधील जागेची मोजणी करता येणार नाही.
याबाबत भूमी अभिलेख उपसंचालक व भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांनी भूमापक व इतर मोजणी करणारे कर्मचारी यांना मोजणी प्रकरणे वाटप करावी. कुठल्याही प्रकारे हयगय किंवा गैरप्रकार घडू नये यासाठी काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.