आरटीईसाठी शाळांना माहिती भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:32 AM2017-12-13T00:32:34+5:302017-12-13T00:32:50+5:30

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत असताना अनेक अडचणींचा सामना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना करावा लागत आहे.

Instructions for filing information for schools for RTE | आरटीईसाठी शाळांना माहिती भरण्याचे आदेश

आरटीईसाठी शाळांना माहिती भरण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देशिक्षण विभाग : २२ डिसेंबरची डेडलाईन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत असताना अनेक अडचणींचा सामना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासंदर्भातील सन २०१२-१३ ते २०१७-१८ या काळातील सर्व माहिती शाळांनी भरून ती तपासणे अनिवार्य आहे. यासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत शाळांना सर्व माहिती पोर्टलवर भरावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, आरटीई प्रवेशपात्र शाळांनी २०१७-१८ साठी आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांसमोर आॅनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. सन २०१२-१३ ते २०१५-१६ पर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये आॅफलाईन प्रवेश झालेले आहेत त्यांनी आरटीई पोर्टलमध्ये याद्या टाईप करणे आवश्यक आहे. त्या याद्या आणि २०१७ पर्यंत झालेले प्रवेश तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शाळेने २०१३ पासून आतापर्यंत शुल्कदेखील नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सर्व माहिती दिलेल्या मुदतीत पूर्ण करून घ्यायची आहे. ही माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी तपासल्यानंतरच २०१८-१९ या वर्षाची प्रवेशाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Instructions for filing information for schools for RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.