आंबियाला विम्याचे संरक्षण

By admin | Published: November 2, 2016 12:19 AM2016-11-02T00:19:47+5:302016-11-02T00:19:47+5:30

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामापासून लागू करण्यात आली.

Insurance cover for Amba | आंबियाला विम्याचे संरक्षण

आंबियाला विम्याचे संरक्षण

Next

शेतकऱ्यांना दिलासा : डाळिंब, मोसंबी, पेरू, लिंबू, केळी आदी अधिसूचित
गजानन मोहोड अमरावती
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना यंदाच्या हंगामापासून लागू करण्यात आली. यामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी, पेरू, डाळींब आदी फळपिकांना निवडक जिल्ह्यांमध्ये आंबिया बहर व गारपीट आदी घटकांसाठी विम्याचे संरक्षण कवच लाभणार आहे.
या योजनेंतर्गत निर्धारित फळपीकनिहाय प्रमाणकानुसार विमा लागू करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळामध्ये केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या त्रयस्त संस्थेमार्फत स्थापन केलेल्या संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी व फळपीकनिहाय प्रभाणके याची सांगड घालून संबंधित विमा कंपनीद्वारा शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई बँकेद्वारा देण्यात येणार आहे. कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगवान वारे, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. अमरावती जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स ही विमा कंपनी प्राधिकृत आहे. अधिसचित फळपिकांसाठी ज्या शेतकऱ्यांची कर्जमर्यादा मंजूर आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची व अन्य शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
विमा कंपनीकडून पीकनिहाय प्रति हेक्टरी प्राप्त वास्तवदर्शी विमा हप्ता दर व प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल व हे अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून समप्रमाणात दिल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी डाळिंब व मोसंबी या फळपिकांसाठी ३१ आॅक्टोबर, पेरू, केळी व संत्रा पिकासाठी ३१ आॅक्टोबर व लिंबू या पिकासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी घोषणापत्रे विमा कंपनीकडे सादर करावयाची आहे. या योजनेत हवामान घटकाचा धोका संपल्याचे ४५ दिवसाचे आत विमा कंपनी नुकसान भरपाई अदा करणार आहे.
मोसंबी पिकाकरिता अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात बडनेरा, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव पेठ, वरूड तालुक्यात वरूड, शेंदूरजनाघाट, लोणी, पुसला, बेनोडा, वाठोडा व राजूराबाजार, मोर्शी तालुक्यात मोर्शी, हिवरखेड, शिरखेड, अंबाडा व नेरपिंगळाई, तिवसा तालुक्यात वरखेड, वऱ्हा, मोझरी तसेच धामणगाव तालुक्यात धामणगाव रेल्वे, चिंचोली व अंजनसिंगी या महसूल मंडळाचा समावेश आहे. केळीसाठी अचलपूर तालुक्यात अचलपूर, पथ्रोट, परतवाडा, परसापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहीगाव, सातेगाव, कापूसतळणी, कोकर्डा, चौसाळा, निमखेड बाजार व चौसाळा या मंडळाचा समावेश आहे.

संत्र्यासाठी या महसूल मंडळाचा समावेश
अमरावती तालुक्यामधील अमरावती, वडाळी, बडनेरा, नवसारी, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव पेठ, भातकुली तालुक्यात निंभा, चांदूररेल्वे तालुक्यात चांदूररेल्वे, पळसखेड, घुईखेड, आमला विश्वेश्वर, सातेफळ, धामणगाव तालुक्यात धामणगाव, चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव, दाभा, शिवणी, मंगरुळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुली चोर, मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव (काटपूर), नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी, वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाठोडा, लोणी, शेंदूरजनाघाट, राजुराबाजार, तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, वरखेड, चांदूरबाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी, बेलोरा, करजगाव, शिरजगाव कसबा व तळेगाव मोहना, अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असदपूर, परसापूर, पथ्रोट व परतवाडा, चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह व टेंभूरसोडा व अंजनगाव तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहीगाव, सातेगाव, कापूसतळणी व कोकर्डा या मंडळाचा समावेश आहे.

Web Title: Insurance cover for Amba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.