पशुधनाला विम्याचे संरक्षण कवच

By Admin | Published: April 19, 2016 12:17 AM2016-04-19T00:17:52+5:302016-04-19T00:17:52+5:30

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळत आहे. परंतु पशुधनाचा लाभ काही शेतकऱ्यांनाच या योजनामध्ये विमा संरक्षण मिळत होते.

Insurance cover for livestock | पशुधनाला विम्याचे संरक्षण कवच

पशुधनाला विम्याचे संरक्षण कवच

googlenewsNext

राष्ट्रीय पशुधन विमा योजना : जिल्ह्यात तीन हजार जनावरांचा काढला विमा
गजानन मोहोड अमरावती
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे संरक्षण मिळत आहे. परंतु पशुधनाचा लाभ काही शेतकऱ्यांनाच या योजनामध्ये विमा संरक्षण मिळत होते. इतर जनावरांना या विम्याचे कवच उपलब्ध नव्हते. आता सरसकट सर्वच पशुधन घटकांना विम्याने संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन महिन्यांत तीन हजार पशुधनांचा विमा काढण्यात आला होता.
राष्ट्रीय पशुधन विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही उपलब्धी झाली आहे. सलग नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामध्ये दोन्ही हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाला संरक्षणाचे विमा कवच देणे व बहुमूल्य पशुधन अपघाती दगावल्यास विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांना पुरेपूर मोबदला देणे अगत्याचे आहे. शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पशुधन विमा योजनेपूर्वी शासकीय योजनेमध्ये वाटप करण्यात आलेल्या जनावरांचा विमा उतरविण्यात येत होता. यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या पशुधनाला कुठलेही संरक्षण नव्हते. मात्र आता शेतकऱ्यांकडील त्यांच्या मालकीच्या जनावरांचा विमा काढण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे.

- तर मिळणार जनावरांच्या किमतीची भरपाई
जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास जसे आग लागणे, अंगावर वीज पडणे, पूर, वादळ, भूकंप, दुष्काळामुळे दगावणे, सर्पदंश इत्यादींद्वारे झाल्यास जनावरांच्या किमतीची भरपाई घेण्यास लाभार्थी पात्र राहणार आहे. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास जनावरांच्या किमतीच्या ७५ टक्के रकम लाभार्थी शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.

जनावरांच्या कानातील बिल्ला हीच ओळख
जनावरांच्या कानाला लावण्यात येणारा बिल्ला हीच जनावरांची ओळख राहणार आहे. जनावरांचा विमा प्रस्ताव तयार करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांच्या मालकासोबत फोटो, कानातील बिल्ला दिला जाईल. तसेच बॅँक खात्याची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी संपर्क साधून विमा काढता येईल.

या योजनेत शेतकऱ्यांच्या सरसकट सर्वच पशुधनाला विम्याचा लाभ घेता येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाला संरक्षण देणे हा योजनेचा उद्देश आहे. सर्वच पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- शैलेंद्र पुरी, सहा. आयुक्त, पशुसंवर्धन

असा मिळणार लाभ
राष्ट्रीय पशुधन विमा योजनेत एका कुटुंबाजवळ असलेल्या पाच जनावरांचा विमा एक वर्षासाठी किंवा तीन वर्षांसाठी काढता येतो.
५० हजार रुपये किमतीच्या जनावरांसाठी तीन वर्षांचा विमा काढण्यासाठी सर्वसाधारण लाभार्थीला २ हजार ६४ रुपये भरावे लागतात.
लाभार्थी जर दारिद्र्यरेषेखालील अथवा अनु.जाती-जमातींचा असल्यास त्याला १ हजार ४२४ रुपये भरावे लगातात. उर्वरित रकमेचा भरणा शासन करणार आहे.
या योजनेअंतर्गत गाय व म्हैस वर्ग आणि शेळी, मेंढी, ससे, डुकरे, याक, एडका तसेच ओझेवाहू जनावरे उदा. घोडे, गाढव, खेचर, ऊंट यांचा विमा काढता येतो.

जिल्ह्यात साडे सहा लाख पशुधन
१९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील लहान जनावरांची १ लाख ८१ हजार १६८ मोठ्या जनावरांची संख्या ५ लाख १२ हजार ६० आहेत. तसेच लहान व मोठी जनावरे अशी एकूण ६ लाख ५० हजार २२८ एवढी जनावरांची संख्या आहे.

Web Title: Insurance cover for livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.