विमाछत्र योजना सेवानिवृत्तांसाठी आरोग्य संजीवनी

By Admin | Published: September 6, 2015 12:04 AM2015-09-06T00:04:54+5:302015-09-06T00:04:54+5:30

शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त झाल्यांनतर उतारवयात वैद्यकीय सेवेची गरज असते.

Insurance Sanjivani for retirement plans | विमाछत्र योजना सेवानिवृत्तांसाठी आरोग्य संजीवनी

विमाछत्र योजना सेवानिवृत्तांसाठी आरोग्य संजीवनी

googlenewsNext

एस.जी. सिध्देवाड यांचे प्रतिपादन : विमाछत्र योजना कार्यशाळा
अमरावती : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त झाल्यांनतर उतारवयात वैद्यकीय सेवेची गरज असते. मात्र, मर्यादित निवृत्तीवेतनामुळे तो मोठ्या आजारांवर खर्च करूशकत नाही. या वयात कुठलीही विमा कंपनी वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय नव्याने वैद्यकीय विमा पॉलीसी देत नाही. यासाठी राज्य शासनाने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना कार्यान्वित केली आहे. योजनेत पात्र शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन, लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक एस.जी. सिध्देवाड यांनी केले.
जिल्हा कोषागार कार्यालय अमरावती व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विमाछत्र योजनेसंबधी एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर वरिष्ठ कोषागार अधिकारी व्ही.व्ही जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी रविंद्र जोगी, लेखाधिकारी सुनील पाराशर, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रशासन अधिकारी हेमंत वाकोडे, एम.डी. इंडिया कंपनीचे जिल्हाप्रमुख गजानन पांडे आदी उपस्थित होते.
सिध्देवाड यांनी योजनेत सहभागी होताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले. विमा योजनेमध्ये एक पॉलीसी प्रिमियममध्ये पती-पत्नी या दोघांना विमा संरक्षण दिले जाते. दरवर्षी १ जुलै ते ३० जून पर्यंत विमा हप्ता भरून लाभ घेता येतो. या योजनेला आरोग्य विमा योजना घोषित करण्यात आले आहे. सुविधा देण्यात येते. यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोय झाली.

Web Title: Insurance Sanjivani for retirement plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.