विना क्रमांकाच्या वाहनामुळे हाती लागला आंतरजिल्हा गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:42+5:302021-06-28T04:10:42+5:30

फोटो २७एएमपीएच०१ अमरावती : विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीशी खाक्या दखविताच त्याने तीन जिल्ह्यातून ...

An inter-district criminal was caught with an unnumbered vehicle | विना क्रमांकाच्या वाहनामुळे हाती लागला आंतरजिल्हा गुन्हेगार

विना क्रमांकाच्या वाहनामुळे हाती लागला आंतरजिल्हा गुन्हेगार

Next

फोटो २७एएमपीएच०१

अमरावती : विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीशी खाक्या दखविताच त्याने तीन जिल्ह्यातून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदर दुचाकी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका आरोपीला विकल्याचे सांगितले. सदर आंतरजिल्हा गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा ठाणे हद्दीतील अकोला नाका परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली. त्यानंतर कारंजा येथून अन्य आरोपीला अटक केली.

पोलीससूत्रानुसार, शेख समीर ऊर्फ चिन्या शेख नजीर (३५, रा. पठाणपुरा नेर जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना आरोपी हा संशयितरीत्या विना नंबर प्लेट असलेले दुचाकी वाहन घेऊन पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन वाहनाच्या कागतपत्राची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांना त्याला बारकाईन विचारपूस केली असता, त्याने अमरावती शहरातून ३, अमरावती ग्रामीणमधून १, यवतमाळ जिल्ह्यातून २, वाशिम जिल्ह्यातून १अशा सात वेेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदर चोरीतील वाहने आरोपी शेख समीरने जावेद बेग युनूस बेग मिर्झा (३०, रा. काजीपुरा कारंजा जि. वाशिम याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी सात वाहनासह ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नमूद आरोपीला खोलापुरी गेट येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे व पथकाने यशस्वी केली.

बॉक्स

तीन दिवसांपूर्वीच मिळाली पथकाला टीप

दुचाकी चोरीतील अट्टल गुन्हेगार असलेला शेख समीर हा बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत फिरत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला तीन दिवसापूर्वीच मिळाली होती. पथक त्याच्या मागावर होते. मात्र, विना क्रमांकाची दुचाकी दिसताच पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी कारंजा येथून मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले. सोमवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Web Title: An inter-district criminal was caught with an unnumbered vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.