घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

By प्रदीप भाकरे | Published: August 17, 2023 07:45 PM2023-08-17T19:45:03+5:302023-08-17T19:45:20+5:30

आरोपीकडून ९.११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

Inter-state burglary suspect jailed, action by LCB | घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

googlenewsNext

अमरावती: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय ठकास जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळविले. दिपक भिमराव दांडगे (२५ वर्ष, रा. घुघरी ता. भैसदेही, जि. बैतुल मध्यप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. १७ ऑगस्ट रोजी केलेल्या दमदार कारवाईत आरोपीकडून ११७ ग्रॅम सोने, ४२४ ग्रॅम चांदी, १० मोबाईल फोन, लॅपटॉप, मोटर सायकल व रोख असा तब्बल ९ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हयातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांनी आपले पथक कार्यान्वित केले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार व त्यांचे पथक १७ ऑगस्ट रोजी मेळघाटात होणा-या चो-यांबाबत तपास करीत असता मेळघाटातील गावात चोरी करुन दिपक दांडगे नावाचा इसम सध्या परतवाडा शहरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून त्याला परतवाडा शहरातून ताब्यात घेण्यात आले.

१२ गुन्हयांची कबुली

त्याने चिखलदरा, आसेगाव, अचलपुर, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी व चांदुरबाजार भागात घरफोडया केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद १२ गुन्हयांचा उलगडा झाला आहे. चोरलेले सोने, चांदीचे दागिने परतवाडा शहरात विकल्याची कबुली त्याने दिली. त्याचेकडून तब्बल ६.४३ लाख रुपये किमतीचे सोने, १ लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप, विनानंबरची मोटर सायकल व २८ हजार रोख जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, सागर धापड, शिवा सिरसाट, हर्षद घुसे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Inter-state burglary suspect jailed, action by LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.