मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

By गणेश वासनिक | Published: July 3, 2023 03:30 PM2023-07-03T15:30:49+5:302023-07-03T15:33:12+5:30

१ जुलैपासून प्रारंभ, रेल्वे स्थानकादरम्यान लाईनची क्षमता वाढली, एकाच वेळी दोन ट्रेन चालविता येणार

'Intermediate Block Station' system in Bhusawal section of Central Railway | मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ प्रणाली

googlenewsNext

अमरावती : मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ (आयबीएस) ही प्रणाली १ जुलैपासून कार्यान्वित केली आहे. या न्वया प्रणालीमुळे दाेन रेल्वे स्थानकादरम्यान एक ट्रेन एवेजी दाेन ट्रेन कंट्रोलिंग करता येते, हे विशेष. मनमाड रेल्वे स्थानक आणि समीट रेल्वे स्थानकादरम्यान लाईनची क्षमता वाढवण्यासाठी ही प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे.

नवीन आयबीएस स्टेशनच्या मदतीने २५४ किमी अंतरावर एकाच वेळी १ ट्रेन ऐवजी २ ट्रेन धावू शकते. त्यामुळे प्रत्येक ट्रेनच्या धावण्याच्या वेळेत ५ मिनिटे वाचणार आहे. प्रत्येक विभागात सुमारे ५० गाड्या धावतात. त्यामुळे लाईनची क्षमता वाढेल आणि वेळेची बचत होईल. हे नवीन आयबीएस स्थानक इगतपुरी-मनमाड सेक्शनवरील मनमाड स्थानकाजवळील व्यस्त मार्गावर देखील गर्दी कमी करेल. आतापर्यंत भुसावळ विभागात ३० आयबीएस स्टेशन उभारण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने महत्वाच्या स्टेशनवर नवी प्रणाली विकसीत केली जाणार आहे.

गाड्यांचे अपघात टाळता येणार

नवीन आयबीएस स्टेशनवर दोन नवीन सिग्नल नंबर पोस्ट बसवण्यात आल्या आहेत. सिमेन्सने नवीन ड्युअल डिटेक्शन एक्सल काउंटर बसवले. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या चाकांची संख्या मोजली जाईल. त्यामुळे दोन ट्रेनमध्ये होणारे अपघात टाळता येतील आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. या नव्या प्रणालीत स्टेटकॉन मेक आयपीएस २०० ॲपिअर क्षमतेच्या बॅटरीचा पुरवठा करण्यात आला आहे. आरटीयू बसवण्यात आले असून ते स्टेशनला चांगल्या दळणवळणासाठी जोडलेले आहे. रिलायन्स मेक फ्यूज अलार्मच्या माध्यमातून नव्या आयबीएस स्टेशनवर कोणत्याही प्रकारचा असामान्य शोध घेता येणार आहे.

‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ म्हणजे काय? 

‘इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन’ हे एक प्रकारचा स्टेशन आहे. ज्यामध्ये लाइन क्षमता वाढवण्यासाठी दोन स्टेशनमधील विभाग दोन भागात विभागला जातो. यात स्टेशनमध्ये सामान्य प्लॅटफॉर्म, स्टेशन प्रबंधकाची खोली आदी नाहीत. परंतु सिग्नल अप आणि डाउन लाईनवर आहेत, जे लगतच्या स्टेशनद्वारे नियंत्रित केले जातात. या २ स्थानकांदरम्यान १ ट्रेन चालवण्याऐवजी, आयबीएस स्टेशनच्या मदतीने २ ट्रेन चालविता येते. ज्यामुळे त्या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होते.

Web Title: 'Intermediate Block Station' system in Bhusawal section of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.