महापालिका प्रशासनात अंतर्गत खांदेपालट; स्वच्छता विभाग उपायुक्तांकडे; अतिक्रमण निर्मुलनाला दोन प्रमुख

By प्रदीप भाकरे | Published: September 14, 2023 01:30 PM2023-09-14T13:30:05+5:302023-09-14T13:32:53+5:30

आयुक्तांचे पाच स्वतंत्र आदेश

Internal switching in Amravati Municipal Administration; Sanitation dep to Deputy Commissione | महापालिका प्रशासनात अंतर्गत खांदेपालट; स्वच्छता विभाग उपायुक्तांकडे; अतिक्रमण निर्मुलनाला दोन प्रमुख

महापालिका प्रशासनात अंतर्गत खांदेपालट; स्वच्छता विभाग उपायुक्तांकडे; अतिक्रमण निर्मुलनाला दोन प्रमुख

googlenewsNext

अमरावती : महापालिकेतील स्वच्छता विभागाची संपुर्ण जबाबदारी नव्याने उपायुक्त (प्रशासन) डॉ. मेघना वासनकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर विशेष कार्य अधिकारी व वैद्यकीय स्वच्छता अधिकारी पद संपुष्टात आणून वैद्यकीय अधिकारी सीमा नैताम यांची बदली हैदरपुरा शहरी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. याशिवाय अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख अजय बन्सेले यांची बदली रामपुरी कॅम्प झोनमध्ये वरिष्ट लिपिक म्हणून करण्यात आली. नव्या आदेशानुसार, बन्सेलेंऐवजी योगेश कोल्हे व उमेश सवई हे दोघे नवे अतिक्रमण विभाग प्रमुख असतील. दोन्ही उपायुक्तांमधील विभागांची अदलाबदल करण्यात आली आहे.             

महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी १३ सप्टेंबर रोजी उशिरा सायंकाळी अंतर्गत खांदेपालट करणारे पाच स्वतंत्र आदेश काढले. त्या नव्या आदेशानुसार, डॉ. वासनकर यांच्याकडे स्वच्छता विभागाची संपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. दैनंदिन कचरा संकलन, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, प्रकल्प, स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता कंत्राटदार, स्थायी कामगार, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी, नाल्यांची साफसफाई अशी सर्व जबाबदारी वासनकर यांच्याकडे सोपविण्यात आली. याशिवाय, अतिक्रमण निर्मुलनाची जबाबदारी झोननिहाय देण्यात आली आहे. योगेश कोल्हे यांच्याकडे रामपुरी कॅम्प, राजापेठ व भाजीबाजार व उमेश सवई यांच्याकडे दस्तुरनगर व बडनेरा झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. ते दोघे अतिक्रमण निर्मुलन विभाग पथकप्रमुख असतील.

डॉ. वासनकर यांच्याकडे ११ विभाग

उपायुक्त प्रशासन डॉ. मेघना वासनकर यांच्याकडे नव्याने सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. त्याशिवाय त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरसचिव, कायदा, अतिक्रमण, जनसंपर्क, अग्निशमन, कार्यशाळा, शिक्षण व क्रिडा, उद्यान विभागासह झोन क्रमांक २,४ व ५ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्यारेवाले यांच्याकडे सर्वाधिक जबाबदारी

उपायुक्त सामान्य जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे रामपुरी कॅम्प व दस्तुरनगर झोनव्यतिरिक्त १४ महत्वपुर्ण विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे समाजविकास, बाजार परवाना, जनगणना, निवडणूक, सांख्यिकी, भांडार, पशुसंवर्धन, संगणक, महिला व बालविकास, एनएलयुएम, मनपा स्पर्धा अभ्यासिका, अभिलेखागार, जलशक्ती अभियान व भूजल संवर्धन विभाग देण्यात आला आहे.

एडीटीपी, अर्थ आयुक्तांकडे

महापालिकेतील नगररचना, अर्थ व लेखा तथा लेखापरिक्षण विभाग आयुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली असेल. तर बांधकाम विभाग, पर्यावरण, मालमत्ता कर व सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असतील.

Web Title: Internal switching in Amravati Municipal Administration; Sanitation dep to Deputy Commissione

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.