आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:00 PM2017-11-11T23:00:22+5:302017-11-11T23:01:03+5:30

सोयाबीनचे दर कमी होण्यामागे हलक्या प्रतवारीचा तर्क लावला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे.

International Soybean Soya Shot | आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा सोयाबीनला फटका

आंतरराष्ट्रीय सट्ट्याचा सोयाबीनला फटका

Next
ठळक मुद्दे‘एनसीडीईएक्स’चा परिणाम : डीओसीची निर्यात मंदावली, दिवसातून चार वेळा दरात चढ-उतार

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोयाबीनचे दर कमी होण्यामागे हलक्या प्रतवारीचा तर्क लावला जात असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याचाही फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सोयाबीनचा समावेश असणारे एनसीडीईएक्स (नॅशनल कमोडिटी डेरिव्हेशन एक्सचेंज लिमिटेड) मध्ये दिवसभरात चार वेळा दर कमी-जास्त होत असल्यानेच सोयाबीन उत्पादकांची खुलेआम लूट सुरू आहे.
व्यापाºयांच्या परिभाषेत ‘डब्बा’ अशी ओळख असलेल्या एनसीडीईएक्सचा दिवसाचा पहिला दर सकाळी ११.३० दरम्यान जाहीर झाल्यानंतरच व्यापाºयांकडून स्थानिक बाजारात सोयाबीनची खरेदी सुरू होते. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेत सोयाबीनचे उत्पादन घटले तरी ब्राझील, अर्जेन्टिना आदी सोयाबीन उत्पादक असलेल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. त्यामुळे भारताचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या चीनकडून सोयाबीनच्या ‘डीओसी’ची मागणी मंदावली. त्यातच महाराष्ट्रात सोंगणी व मळणीच्या काळात अवकाळी पावसामुळे सोयाबीनची प्रतवारी घसरून सरासरी उत्पादन कमी झाले. त्यामुळे सोयाबीन केकची मागणीदेखील मंदावली आहे. याचा थेट परिणाम निर्यातीवर झाला व सोयाबीनचे दर आधारभूत किमतीपेक्षाही कोसळले असल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.
मागील वर्षी अति पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे नुकसान झाले, तर यंदा पेरणीपासून अत्यल्प पाऊस व काढणीच्या हंगामात अवकाळीचा कहर यामुळे सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. यंदाच्या हंगामात व्यापाºयांनी चक्क दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली. शासनाने नाफेडद्वारा खरेदी सुरू केली असली तरी ‘एफएक्यू’ ग्रेड असल्यामुळे शेतकºयांना माघारी पाठविण्यात येते व नाइलाजास्तव शेतकºयांना व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
प्रतवारीमुळे ‘डीओसी’ची निर्यात मंदावली
मागील दोन वर्षांचा आढावा घेता, सोयाबीन ‘डीओसी’ (पावडर) चे दर साधारणपणे ४५०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल होते.यंदा मात्र ते २६०० ते २८०० रुपये असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. डीओसीचा वापर पशुखाद्य व बिस्कीट निर्मितीत होतो. भारतात प्रामुख्याने कोंबडी खाद्य म्हणून या पावडरचा वापर होतो. आंतरराष्ट्रीय दर घसरल्यानेच ‘डीओसी’ची निर्र्यात मंदावली आहे.
काय आहे व्यापाºयांचा ‘डब्बा’?
सोयाबीनचा समावेश एनसीडीईएक्समध्ये असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारभावातील चढ-उतारांचा देशांतर्गत भावावर थेट परिणाम होतो. साधारणपणे सकाळी ११.३० च्या सुमारास पहिला आंतरराष्ट्रीय दर जाहीर झाल्यानंतरच स्थानिक व्यापारी त्या अनुषंगाने खरेदी करतात. याला व्यापाºयांच्या सांकेतिक भाषेत ‘डब्बा’असे संबोधण्यात येते. जोवर या डब्ब्याचे दर जाहीर होत नाही, तोवर स्थानिक बाजारात व्यापारी खरेदी करीत नसल्याचे वास्तव आहे.
इंदूर सेंटरवर २७५० ते २७८० रुपये पोहोच
अडते व व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एनसीडीएक्सचे केंद्र असणाºया इंदूरला शुक्रवारी २,७५० ते २,७८० रुपये प्रतिक्विंटल पोहोच असा दर होता. हा दर आधारभूत किमतीपेक्षा ३०० रुपयांनी जागेवरच कमी आहे. त्यामुळे व्यापारी भाव पाडून दोन हजार रुपयांपासून सुरुवात करतात. यंदाच्या सोयाबीनची प्रतवारीदेखील कमी असल्याने सोयाबीन प्लांटवरच कमी-अधिक भावात विकले जात असल्याचे वास्तव या सूत्रांनी सांगितले.

यंदा उत्पादन कमी असतानाही डीओसीचे भाव पडले. कमोडिटी मार्केटचाही फटका आहे. हमी भावात उत्पादनखर्च निघणे शक्य नसल्याचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षांना पटवून दिले.
- विजय जावंधिया, शेतकरी नेते

कमोडिटी मार्केटसह कुक्कुटपालकांच्या लॉबीने भाव पाडले. पामतेलाच्या आयातीचा परिणाम झाला आहे. त्यातच पावसामुळे प्रतवारी कमी होऊन उत्पादनही कमी झाले.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

यंदा अवकाळीने सोयाबीनची प्रतवारी घसरली. डीओसीलाही भाव नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाली आहे. एनसीडीईएक्सचा सोयाबीनच्या दरावर कोणताही फरक पडला नाही.
- अमर बांबल, अडते-व्यापारी

Web Title: International Soybean Soya Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.