मे-जूनमध्ये रुग्णालयांची उलटतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:16 AM2018-04-03T00:16:42+5:302018-04-03T00:16:42+5:30

राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुट्या आढळ्ल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली. त्या अनुषंगाने त्रुटी आढळून आलेल्या राज्यातील अशा सर्व दवाखान्यांची मे-जूनमध्ये पुनर्तपासणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Interrogation of hospitals in May-June | मे-जूनमध्ये रुग्णालयांची उलटतपासणी

मे-जूनमध्ये रुग्णालयांची उलटतपासणी

Next
ठळक मुद्देअतिरिक्त संचालकांचे पत्र : त्रुट्यांच्या पूर्ततेची होणार खातरजमा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुट्या आढळ्ल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली. त्या अनुषंगाने त्रुटी आढळून आलेल्या राज्यातील अशा सर्व दवाखान्यांची मे-जूनमध्ये पुनर्तपासणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. १५ मार्च ते ३१ मे २०१७ या कालावधीत झालेल्या तपासणीत ६७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये या त्रुटी आढळून आल्या होत्या.
त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाºयांना तपासणीचा धडक कार्यक्रम देण्यात आला आहे. १ मे ते ३० जून २०१८ या कालावधीत समिती सदस्यांनी या सर्व दवाखान्यांची पुन्हा तपासणी करावी व त्रुटीची पूर्तता झाली किंवा कसे, याची खतरजमा करावी, त्याचा अहवाल कार्यालयास पाठवावा, असे निर्देश कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी १९ मार्चला दिले. सदर तपासणीसाठी आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकाºयांची संयुक्त पथक बनविले जाईल. या तपासणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोय अधिकाºयांकडे देण्यात आली आहे.
अशा आढळल्या होत्या त्रुटी
बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निरोधक यंत्रणा प्रमाणपत्र, बायोमेडिकल वेस्ट प्रमाणपत्र, पात्रता नसताना रुग्णालय चालविण्याचे गंभीर प्रकार गतवर्षी केलेल्या तपासणीत उघड झाले. त्यांना नोटीसद्वारे त्रुटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. तथापि, अजूनही अनेक रुग्णालये व दवाखान्यांकडून त्रुटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. पदवी एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसºया पॅथीची, असा प्रकार त्यावेळी उघड झाला. त्याअनुषंगाने १ मे ते ३० जून २०१८ दरम्यान होणाºया धडक तपासणी मोहिमेचा बोगस डॉक्टरांनी धसका घेतला आहे.

ज्या दवाखाने-रुग्णालयांत गतवर्षी त्रुटी आढळल्यात त्यांची पूर्तता झाली किंवा कसे, याची खातरजमा करण्यासाठी पुनर्तपासणीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी पथकाचे कार्यान्वयन केले जात आहे.
- सीमा नैताम, वैदयकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Interrogation of hospitals in May-June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.