सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद

By प्रदीप भाकरे | Published: February 25, 2023 02:45 PM2023-02-25T14:45:41+5:302023-02-25T14:46:26+5:30

आठ राज्यात १८ गुन्ह्यांची नोंद

Interstate gang of cyber goons rampant; Jailed from Jamtada in Jharkhand | सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद

सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड; झारखंडमधील जामताडा येथून जेरबंद

googlenewsNext

अमरावती : सायबर भामट्यांची आंतरराज्यीय टोळी गजाआड करण्यात शहर आयुक्तालयातील सायबर पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना सायबर गुन्ह्यांचे पॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंडमधील जामताडा येथून अटक करण्यात आली. अभिषेक अब्राहम पुर्ती (१९, रा. गोराटोली, जिल्हा: खुंटी, झारखंड) व अमरेज शिवशंकर उराव (१९, रा. लोहारा जि. गुमला, झारखंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सायबर पोलीस ठाण्याने शुक्रवारी यशस्वी कारवाई केली.

आरोपींनी सामान्य लोकांच्या ऑनलाईन फसवणुकीकरीता १६ सिम व १५ वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईलचा व सहा बँक खात्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. येथील प्रितिश हटवार यांनी ॲमेझॉनवरून नळाची मागणी केली होती. मात्र काही नळ कमी आल्याने त्यांनी कस्टमर केअरला संपर्क साधला. पुढे क्विक सपोर्ट व कस्टमर सपोर्ट असे दोन ॲपडाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख ६१ हजार ७७५ रुपये परस्परच कपात झाले होते.

याप्रकरणी ९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयांच्या तपासा दरम्यान यातील आरोपी हे झारखंड येथील जामताडा परिसरातील असल्याचे माहिती झाले. त्यावरून सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक महेन्द्र इंगळे, सपोउपनि चैतन्य रोकडे, शैलेन्द्र अर्डक, उल्हास टवलारे यांचे पथक झारखंडला गेले. ते आरोपी हे धनबाद, देवघर, सारट, जामताडा, रांची अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. तब्बल पाच दिवसानंतर जामताडा येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

असे आहेत गुन्हे दाखल

आरोपींवर महाराष्ट्रात चार, उत्तरप्रदेश व गुजरात येथे प्रत्येकी तीन, तेलंगणा येथे चार, राजस्थान, दिल्ली, आंध्रप्रदेश व केरळ येथे प्रत्येकी एक अशा एकुण आठ राज्यात १८ गुन्हे नोंद आहेत. ते वॉन्टेड असून त्यांच्याकडून अन्य राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल, दोन सिम व ५१ हजार रुपये फ्रिज करण्यात आले आहे.

यांनी केली कामगिरी

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील व विक्रम साळी, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, सायबरच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक महेन्द्र इंगळे व रविंद्र सहारे, सहायक उपनिरिक्षक चैतन्य रोकडे, शैलेन्द्र अर्डक, उल्हास टवलारे, पकंज गाडे, संग्राम भोजने यांनी ही कारवााई केली.

Web Title: Interstate gang of cyber goons rampant; Jailed from Jamtada in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.