मानवतेच्या तीर्थावर माणुसकीचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:13 PM2018-10-29T23:13:02+5:302018-10-29T23:13:32+5:30
वं. तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी गुरुकुंज येथे महासमाधी परिसरातील महामार्गावर लाखो गुरुदेव भक्तांची चिकार गर्दी जमली होती. दरम्यान अम्ब्युलन्स आल्यानेर् पुन्हा मानवतेचा परिचय देत एकीकडे मार्ग मोकळा केला गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज(मोझरी) : वं. तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी गुरुकुंज येथे महासमाधी परिसरातील महामार्गावर लाखो गुरुदेव भक्तांची चिकार गर्दी जमली होती. दरम्यान अम्ब्युलन्स आल्यानेर् पुन्हा मानवतेचा परिचय देत एकीकडे मार्ग मोकळा केला गेला.
राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ समीप येत होती. दुसरीकडे गुरुदेव भक्तांचा ओढा गुरुमाऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महासमधीकडे वाढत होता. अनेक गुरुदेवभक्त, पोलिसांच्या नियोजनाच्या तारत्म्यावर नाराज होते. त्यांचेच अनेक भक्त जागेअभावी रस्त्याला कवेत घेऊन तेथेच पदनस्त झाले आणि अकस्मात काही वेळेच्या अंतराने दोन रुग्णवाहिका सायरनच्या आवाजात रस्त्यावर आल्या आणि गुरुमाऊच्या शिस्तीच्या तालमितील गुरूदेवभक्तांनी लगेच मार्ग मोकळा करून दिला हे विशेष.
याचबरोबर सोमवारी प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या ड्रोन कॅमेºयाची अवकाशात जुगलबंदी दिसून आली प्रत्येक गुरुदेवभक्तांवर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने अखेरपर्यंत नजर होती, हे विशेष.
वं. राष्टÑसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाकरिता यंदा गुरूकुंजात दरवर्षीच्या तुलनेने अधिक गुरूदेव भक्तांनी उपस्थिती लावली. अंदाजे पाच लाखांच्यावर गुरूदेवभक्त कार्यक्रमाकरिता महासमाधी व सभामंडपात उपस्थित झाले. यंदा मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप तयार करण्यात आले होते. तरीही यंदाच्या गर्दीने सभामंडपाला कवेत घेऊन राष्टÑीय महामार्ग मौनश्रद्धांजली अर्पण करण्याकरिता काबिज केला. परिणामी वाहतूक पोलिसांची या दरम्यान प्रचंड दमछाक झाली. शिस्तीचा भोक्ता असणाºया गुरूदेव भक्ताला अखेरच्या क्षणापर्यंत जागेसाठी भटकावे लागले. शेवटी ४.५० मिनिटांनी महामार्ग थांबविण्यात आला आणि लाखो गुरूदेव भक्त महामार्गावर आसनस्थ झाले आणि आपल्या गुरूमाऊलीला शिस्तीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. आजच्या या कार्यक्रमाला राजकीय पुढाºयांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये खा. आनंदराव अडसूळ, माजी मंत्री वसंत पुरके, आ. रवि राणा, आ. यशोमती ठाकूर, आ. किर्तीकुमार भांगडीया, नवनीत राणा, निवेदिता चौधरी-दिघडे, दिनेश सूर्यवंशी तसेच अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ संचालक मंडळ व समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते हे कविशेष.
गुरुदेवभक्तांची संख्या दरवर्षी वाढतेय
दरवर्षी होणारा गर्दीचा उच्चांक पाहता प्रशासनाच्यावतीने राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूदेव भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी जागा अधिग्रहित करणे गरजेचे झाले, असून या ठिकाणी गर्दीचा उच्चांक नित्यनेमाने वाढतच चालेला आहे. भविष्यात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या दिशेने पावले उचलण गरजेचे झाले आहे.