नकाशे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा
By admin | Published: November 21, 2015 12:16 AM2015-11-21T00:16:25+5:302015-11-21T00:16:25+5:30
चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी...
धरणे आंदोलन : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि इतर मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर केले.
प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रमुख मागणीत विजय नकाशे मुख्याध्यापक सेमाडोह यांना पंचायत समितीच्या दौऱ्यानंतर शाळेच्या कार्यालयातच केलेल्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. विजय नकाशे यांचे कुटुंबीयास २५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. नीता नकाशे यांना विशेष बाब म्हणून जि.प. अमरावतीमध्ये तत्काळ नोकरी देण्यात यावी. ज्या शालेय पोषण आहारामुळे विजय नकाशे आपल्या प्राणास मुकले त्या शालेय पोषण आहार योजनेची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून पूर्णत: काढून घेण्यात यावी आदी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.
यावेळी रामदास कडू, किरण पाटील, अनिल देशमुख, रवींद्र निंघोट, विजय उभाड, राजेंद्र गावंडे, ज्ञानेश्वर सावरकर, नीळकंठ यावले, विकास रेखाते, आशिष पाटील, शरद काळे, प्रमोद दखने, गजानन बोरोडे, दत्ता भेले, प्रवीण खरबडे, ओंकार राऊ त, अनिल वानखडे, रत्नाकर करुले, चंदू यावले, चंदन खर्चान, उमेश गोदे, आशिष पावडे, विद्या बोके, संजय मगर्दे, मदन उमक, प्रवीण खरबडे, राजेंद्र मांगरुळकर, प्रमादे घाटोळ, पंडीत बनसोड राजेंद्र दिक्षित, उपस्थित होते. (प्रतिनिधी)