व्हायरल आॅडिओ क्लिपची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:53 AM2019-04-27T00:53:02+5:302019-04-27T00:54:30+5:30

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे.

Investigate viral audio clips | व्हायरल आॅडिओ क्लिपची चौकशी करा

व्हायरल आॅडिओ क्लिपची चौकशी करा

Next
ठळक मुद्देपत्रपरिषद : ‘आप’ची पोलिसांतही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार आम्ही फ्रेजरपुरा ठाण्यात व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी पाच दिवसांत पूर्ण करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे अमरावती विधानसभाप्रमुख मोईन देशमुख यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिला.
फ्रेजरपुरा ठाण्यात याप्रकरणी बुधवारी लेखी तक्रारही करण्यात आली. त्यामध्ये याप्रकरणी तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, सदर व्हायरल क्लिपमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या एका माजी आमदाराला निवडणुकीत मदत मागीत आहेत, तर माजी आमदार त्यांना मार्गदर्शन करीत असतानाच निवडणुकीचे बजेटसुद्धा सांगत आहेत. अशा भ्रष्ट नेत्यांना कुठल्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये तसेच जनतेनेसुद्धा अशा नेत्यांवर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवावा, असे आवाहनच मोइन देशमुख यांनी पत्रपरिषदेतून केले.
आपच्या नेत्या रंजना मामर्डे, राहुल चव्हाण, किरण गुडधे, घनश्याम ढोले, प्रवीण काकडे आदींची पत्रपरिषदेला उपस्थिती होती.

Web Title: Investigate viral audio clips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप